गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा गुरुवारी जाहीर करण्यात आल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी गुजरातमध्ये एकूण ४.९ कोटी मतदार मतदानात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशसह गुजरातमध्ये ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी ४.६ लाख नवीन मतदार मतदान करतील. ५१,७८२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. १४२ मॉडेल मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. दिव्यांगांसाठी १८२ विशेष मतदान केंद्रे बांधण्यात येणार आहेत. महिलांसाठी १,२७४ मतदान केंद्रे असतील. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, गुजरात विधानसभा निवडणुकीत ३,२४,४२२ नवीन मतदार यावेळी प्रथमच मतदान करतील. एकूण मतदान केंद्रांची संख्या ५१,७८२ आहे. राज्यातील किमान ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था असेल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार १२७४ मतदान केंद्रे अशी असतील ज्यात फक्त महिलाच तैनात असतील.
हे ही वाचा:
मुंबईत एका मुलीचे फुटपाथवरून अपहरण, दोन महिला अटकेत
राज्यातील बँकिंग घोटाळ्यांची होणार चौकशी
भारताने बांगलादेशला नमवले आणि पाकिस्तानची केली कोंडी
नाशिकमध्ये देशातील पहिली खासगी बाजार समिती
निवडणुकीदरम्यान कोरोनाची लागण झाल्यास, कोरोना रुग्णाला घरबसल्या मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही मतदाराला तक्रार करायची असल्यास. त्याचा कोणत्याही उमेदवार किंवा पक्षाचा प्रभाव असल्यास तो थेट निवडणूक आयोगाकडे मोबाईल फोनद्वारे तक्रार करू शकतो. तक्रारीच्या ६० मिनिटांत एक टीम तयार करून १०० मिनिटांत तक्रारीचे निराकरण केले जाईल.