महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. १३ वर्षांची मुलगी १८ दिवसांपासून बेपत्ता आहे. या लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून बुधवारी कोल्हापुरात भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असून माझे नाव राणे आहे, ठाकरे नाही, असे नितेश राणे म्हणाले. हिंदू सुनेकडे कुणी चुकीच्या नजरेने पाहिलं तर डोळे काढून घेऊ, असा इशारा राणे यांनी यावेळी दिला.
कोल्हापूर शहरात हे प्रकरण तापत असल्याचे पाहून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र १८ दिवस उलटूनही मुलीचा शोध लागलेला नाही. ती शाळेतून निघाली होती आणि परत आलीच नाही. त्याचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही. दरम्यान, मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. पण पोलिसांचे पथक त्या मुलीला शोधून काढू शकलेलं नाही.
नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील भवानी मंडपातून जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी राज्यात हिंदुत्ववादी सरकार आमच्या नादाला लागू नका. हिंदू सुनेकडे वाकड्या नजरेने पहिले तर डोळे काढून घेऊ, असा इशारा दिला.
तुम्ही हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या. तुम्हाला पुढे कसं सुखरुप घरी पाठवायचं हे नितेश राणे पाहून घेईल. मी तुम्हाला शब्द देतो. कारण तिथं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून बसले आहेत हे लक्षात ठेवा. एक कडवट हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री म्हणून बसले आहेत.त्यामुळे तुम्ही काहीच चिंता करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
हे ही वाचा:
भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू
मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी
मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश
भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची
लव्ह जिहादच्या विरोधात हिंदू जनक्रोश मोर्चा
तपास लवकर व्हावा, अशी विनंती कुटुंबीय वारंवार करत आहेत. दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करू, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेविरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी आज कोल्हापुरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भाजपचे आमदार नितेश राणे करत होते.