22 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषविराटला हा विक्रम करण्यासाठी हव्यात फक्त १६ धावा

विराटला हा विक्रम करण्यासाठी हव्यात फक्त १६ धावा

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची बांगलादेशशी झुंज

Google News Follow

Related

भारतीय संघ जेव्हा बांगलादेशविरुद्ध टी-२० वर्ल्डकपमध्ये आमनेसामने येईल तेव्हा विराट कोहलीला एक मोठा विक्रम करण्याची संधी असेल. ऍडलेडवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील महत्त्वाचा सामना होणार आहे. या सामन्यावर भारताचे भवितव्य अवलंबून असेल. पण या सामन्यात विराटवरही सगळ्यांचा नजरा असतील.

दोन सामन्यात लागोपाठ अर्धशतके ठोकणारा विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र १२ धावांवर बाद झाला होता. ही लढत भारताने गमावली होती. आता विराटला अवघ्या १६ धावांची गरज आहे ती टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावांची नोंद करण्यासाठी. हा विक्रम सध्या श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेच्या नावावर आहे.

टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा आतापर्यंत जयवर्धनेच्या नावावर आहेत. त्याने १०१६ धावा केलेल्या आहेत. तर विराटच्या खात्यात १००१ धावा जमा आहेत. त्यामुळे विराटला हा विक्रम मागे टाकण्यासाठी आणखी १६ धावांची गरज आहे.

हे ही वाचा:

एवढी हिम्मत ! पोलीस अधिकाऱ्याच्याच खुर्चीत बसून केला व्हिडिओ शूट

दादर हादरले! छबीलदास शाळेत सिलिंडरचा स्फोट, तीन जखमी

कठीण समय येता, मूळ शिवसैनिक कामास येतो

फडणवीस म्हणाले, खोटा नरेटिव्ह तीन दिवस चालतो

 

बांगलादेशविरुद्ध विराट हा विक्रम करणार की नाही, याबद्दल आता क्रिकेटचाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पण बांगलादेश सामन्यात विजय मिळविणेही भारताला गरजेचे असेल. भारताने पाकिस्ताना आणि नेदरलँड्स यांना पराभूत केले होते. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. आता बांगलादेशविरुद्ध सावधगिरी बाळगत पराभूत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. पाकिस्तानला झिम्बाब्वेने पराभूत केल्यानंतर वर्ल्डकपच्या या गटातील समीकरणे बदलली. त्यामुळे आता उपांत्य फेरीत जाण्यासाठी प्रत्येकालाच संघर्ष करावा लागणार आहे.

भारत बांगलादेश लढत २ नोव्हेंबरला दुपारी १.३० वाजता सुरू होईल. भारत दुसऱ्या गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन गटातून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार असून पहिली उपांत्य फेरी ९ नोव्हेंबरला होईल तर दुसरी लढत १० नोव्हेंबरला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा