श्रीमंत असो की मध्यमवर्गीय…आपली स्वत;ची नवीन कार किंवा बाईक घेण्याचा एक वेगळाच आनंद असतो. त्यासाठी प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो. मग ते पूर्ण करण्यासाठी कर्ज काढण्याची देखील तयारी असते. पण मोटरसायकल खरेदी करण्यासाठी हातात रोख रक्कम ऐवजी नाणी भरलेले पोते घेऊन गेलेलं तुम्ही कधी ऐकले आहे का ? आसाममध्ये मात्र असे घडले आहे. करीमगंज जिल्ह्यातील एक छोटा व्यापारी पोत्यांमध्ये नाणी भरून बाइक खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये पोहोचला. बाईक खरेदी करण्यासाठी त्याने थेट नाण्यांचे पोतेच रिकामे केले. आता बोला..
करीमगंज जिल्ह्यातील रामकृष्ण नगरचे व्यापारी सुरंजन रॉय घराजवळ असलेल्या टीव्हीएसच्या शोरूममध्ये पोहोचला. त्याने त्याच्या स्वप्नातील बाईक खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. किंमत केल्यानंतर त्याने बाईक खरेदी करण्यासाठी एका गोणीत ५० हजारांची नाणी आणल्याचे त्यांनी शोरूमच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांनतर शोरुमचे सर्वच कर्मचारी चक्रावले. सुरुवातीला त्यांना वाटले सुरंजन मस्करी करत आहे. नाण्यांनी भरलेली पोती पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले . मात्र, नंतर शोरूम मालकाने दुचाकी देण्याचे आणि डाऊन पेमेंट म्हणून नाणी घेण्याचे मान्य केले.
हे ही वाचा:
भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू
मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी
मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश
भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची
या नाण्यांच्या मागची कथा सांगताना सुरंजन म्हणाला गेल्या काही वर्षांत त्यांनी बचतीच्या रुपात ही नाणी घरी जमा केली होती. खूप दिवसांपासून नवीन बाईक घेण्याचा विचार करत होतो . त्यासाठीहळूहळू हे पैसे गोळा करत होते. मात्र शोरूमच्या कर्मचाऱ्यांसमोर नाण्यांच्या बदल्यात बाईक घेण्याचे बोलताच सगळेच बुचकळ्यात पडले. शोरूमचे कर्मचारी म्हणाले, सुरुवातीला नाण्यांनी भरलेली पोती पाहून आम्ही थक्क झालो. पण नंतर आम्ही आमच्या बॉसशी बोललो तेव्हा त्यांनी होकार दिला.
Suranjan Roy, a resident of Assam's Karimganj purchased his dream bike with sack full of savings in coins
“He had Rs 50,000 of coins&wanted to buy the bike in finance by depositing the amount as downpayment. We delivered the bike to him,” said Barnali Paul, staff of the showroom pic.twitter.com/yYUiHstGSa
— ANI (@ANI) October 31, 2022