‘येवा कोकण आपलाच असा’ अशी बिरुदावली घेऊन कोकण खऱ्या अर्थाने पर्यटकांच्या मनावर राज्य करीत आहे. अस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोकण पट्ट्यातील मालवण भागात पर्यटकांचा वावर सध्या वाढत आहे. दिवाळी त्यातच आलेला ‘विकएंड’ यामुळे मालवण पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्याच प्रमाणात परदेशातील नागरिकांची ही मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. मालवण नगरीत पर्यटक दाखल झाल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र अतिरिक्त पर्यटकांच्या संख्येमुळे वाहनांच्या पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे.
मालवणमध्ये पर्यटनासाठी महाराष्ट्रासह राज्यभरातून पर्यटक येतात. आता सलग सुटयांमुळे पर्यटक मौज-मजा करण्यासाठी येत असतात. त्यातच मालवणी खाद्यापदार्थनवर ताव मारताना दिसत आहेत. मागील दोन वर्षा अगोदर कोरोना त्यामुळे लागलेला लॉकडाऊन आणि निर्बंधामुळे पर्यटनाला हवा तसा जोर नव्हता. त्यामुळे मालवणात पर्यटन व उद्योग व्यवसाय काही अंशी मंदावला होता. पण मालवणमध्ये पर्यटकांचा वाढता प्रसिसाद पाहता यंदा मागील दोन वर्षाची सर भरून निघेल असा व्यावसायिकांचा दावा आहे.
हे ही वाचा:
सूर्यदेव आणि सौर ऊर्जेबद्दल पंतप्रधान मोदींना काय वाटते?
सेलिब्रेटीला पाहण बेतलं जीवावर, दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी
‘राज्यात गुंतवणूक आणणं वाझेला पाळून वसुली करण्याइतकं सोप्प नाही’
घरमालकांनो भाडेकरूंनची माहिती पोलिसांना द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा
मालवण मधील पर्यटन स्थळांपैकी सर्वात जास्त पसंती ही समुद्रातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसून येते. तर मालवण मधील दांडी, चिवला बीच, तारकर्ली, देवबाग, सुनामी आयलंड, रॉक गार्डन, जय गणेश मंदिर, देवबाग संगम पॉइंट आदी ठिकाणी स्कूबा डायविंग व विविध वॉटर स्पोट् र्स आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. त्याच बरोबर पर्यटक समुद्रात मनसोक्त डुंबण्याचा आनंद ही घेत आहेत. तसेच पर्यटक जेवणासाठी विविध हॉटेल, रेस्टोरंट, खानावळी पर्यटकांनी फुलून गेल्या आहेत. मालवणी बाजारपेठेतील विविध वस्तु व हस्तकला यासोबतच खाद्यामद्धे मालवणी ‘खाजा’ हे पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.