सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे सरकारी कार्यालयांजवळ झालेल्या दोन बॉम्बस्फोटात किमान १०० लोक ठार झाले आहेत. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. सोमालियाच्या राजधानीतील प्रमुख सरकारी कार्यालयांजवळील एका व्यस्त जंक्शनवर शनिवारी दोन कार बॉम्बचा स्फोट झाला, ज्यामुळे मुलांसह शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला, पोलिसांनी सांगितले.
सोमालिया पोलिसांचे प्रवक्ते सादिक दोदिशे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट शिक्षण मंत्रालयाच्या भिंतीजवळ झाला.दुसरा स्फोट एका रेस्टॉरंटसमोर जेवणाच्या वेळी झाला. अनेक रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स असलेल्या भागात टॅक्सी आणि इतर वाहने या स्फोटांमुळे नष्ट झाली. या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. अतिरेकी गट अल-शबाब शहराला लक्ष्य करत असल्याचं म्हटल्या जात आहे .
हे ही वाचा:
सेलिब्रेटीला पाहण बेतलं जीवावर, दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी
गुजरात सरकार ‘ समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत
…. म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवली
यूपीएच्या भोंगळ संरक्षण धोरणाचे दौलत बेग ओल्डी एअर बेसवर दफनnews
मोगादिशूमधील स्फोटाची वेळही धक्कादायक आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सोमालियाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर वरिष्ठ अधिकारी राजधानीत बैठक घेत होते. यामध्ये विशेषत: अल-कायदाशी संबंधित अल-शबाब गटाशी व्यवहार करण्यावर चर्चा करण्यात येत होती. त्याच वेळी हे स्फोट झाले आहेत. स्फोटात लहान मुलांसह अनेक नागरिक जखमी झाले आहेत . घटनास्थळी अनेक मृतदेह दिसले. मृतांपैकी अनेकजण सार्वजनिक वाहनातून प्रवास करत होते. याआधीही पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी मोठा स्फोट झाला होता, ज्यात ५०० हून अधिक लोक मारले गेले होते.