21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषफायर हेअर कटमुळे तरुण होरपळला

फायर हेअर कटमुळे तरुण होरपळला

फायर हेअर कटचच्या नादात तरुण होरपळला

Google News Follow

Related

तरुणाईमध्ये सध्या वेशभूषेसह केशभूषेचे वेग-वेगळे ट्रेड लोकप्रिय झाले आहेत. त्यातच नव्याने आलेल्या केसांच्या स्टाइलसाठी ‘फायर हेअर कट’ जास्तच लोकप्रिय झालेली दिसून येते. मात्र याचे दुष्परिणाम दिसून येत आहे. बुधवारी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वापी या ठिकाणी सलूनमद्धे फायर हेअर कटच्या नादात १८ वर्षीय तरुण होरपळला आहे. सध्या या तरूणाचा समाजमध्यमांवर व्हिडिओ वायरल झाला आहे.

ही घटना गुजरात राज्यात घडली असून, वापीच्या नजीक असलेल्या भडकमोरा भागातील हा रहिवासी तरुण आहे. हा तरुण नवीन पद्धतीच्या फायर हेअर कटसाठी सूलपाडमधील सलूनमध्ये गेला होता. या सलूनमधील कारागीर हे ग्राहकांचे केसांची स्टाइल सेट करून देण्यासाठी आगीचा वापर करतात. त्यालाच फायर हेअर कटींग असे म्हटले जाते. सलूनमध्ये फायर हेअर कटींग केल्यामुळे या तरुणांच्या केसात प्रमाणापेक्षा जास्त रसायन वापरल्यामुळे आगीचा भडका झाला. त्यामुळे या तरुणाचे मान व छाती भाजली गेली. भाजलेल्या आवस्थेत तरुणाला रुग्णालयात भरती करण्यात आले. अशी माहिती वापी पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

‘एअरबस टाटा’ प्रकरणात भाजपाकडून मोठा खुलासा

पंतप्रधान मोदींची नवी संकल्पना ‘एक देश, एक पोलीस गणवेश’

आता टाटा प्रकल्पाचे खापरही शिंदे फडणवीस सरकारच्या डोक्यावर

अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी

प्राथमिक माहितीच्या आधारे पीडित तरुण व केस कापणाऱ्याचे जबाब नोंदवण्याचे पोलिस प्रयत्न करत आहेत. तसेच या पीडित तरुणाला वलसाड येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून सूरत येथील रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजते आहे. अशी माहिती तपास अधिकारी करमसिंहा मकवाना यांनी सांगितले. तसेच ‘फायर हेअर कट’साठी कोणते रसायन वापरले आहे याचा पोलिस शोध घेत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा