27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारण‘एअरबस टाटा’ प्रकरणात भाजपाकडून मोठा खुलासा

‘एअरबस टाटा’ प्रकरणात भाजपाकडून मोठा खुलासा

वेदांता नंतर टाटा एअर बसचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात नव्या वाद निर्माण झाला आहे.

Google News Follow

Related

वेदांता नंतर टाटा एअर बसचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात नव्या वाद निर्माण झाला आहे. शिंदे- फडणवीस सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला, असं म्हणत विरोधक टीका करत आहेत. दरम्यान भाजपाने ट्विट करत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच, भाजपाने ट्विट करत या प्रोजेक्टबद्दल मोठा खुलासा केला आहे.

‘एअरबस टाटा’ प्रकरणात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. उद्धव ठाकरे अडीच वर्षे स्वतःला घरात कोंडून घेतल्यामुळेच ‘एअरबस टाटा’ गुजरातमध्ये गेली, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.

भारताने 126 C-295 Medium Combat Aircraft साठी विविध निविदा मागवल्या होत्या. त्यात एअरबसची निवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली एअरबसच्या फॅक्टरीला भेट दिली. त्यावेळी या विमानांचा स्पेनमधून पुरवठा करण्याचा प्रस्ताव एअरबसने ठेवला. २०१७ मध्ये मेक इन इंडिया अंतर्गत यातील काही विमाने भारतात बनवायची मागणी भारत सरकारने केली. त्यानंतर टाटा समुहासोबत सामूहिक भागीदारी करून एअरबसने २०२० मध्ये भारतात प्रकल्प टाकायला पाहणी सुरु केली. यावेळी महाराष्ट्र सरकारने कोणताही प्रस्ताव दिल्याची नोंद नाही.

सप्टेंबर २०२१ मध्ये बंगळुरू, गुजरात, हैद्राबाद आणि उत्तर प्रदेश येथील प्रस्ताव तपासून ढोलेरा येथे प्रकल्प टाकायचा प्राथमिक निर्णय घेतला. या काळात महाराष्ट्र सरकारने कोणतीही प्रस्ताव किंवा या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची नोंद आढळून आलेली नाही.

त्यानंतर फेब्रुवारी २०२२ ला पुन्हा एकदा प्रकल्पाचं विश्लेषण करण्यात आले. यावेळी सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून कोणीही एअरबसच्या अधिकाऱ्यांना भेटले नाही. सप्टेंबर २०२२ मध्ये एअरबसच्या प्रकल्पासाठी (६ प्रस्तावित प्रकल्प आहेत) महाराष्ट्र सरकार उत्सुक असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना बोलल्याची नोंद आहे.

एअरबसशी चर्चा न करता प्रकल्प महाराष्ट्रात कसा येऊ शकतो? यावर महाविकास आघाडीने मार्गदर्शन करावे. तब्बल अडीच वर्षात एकही प्रकल्प महाराष्ट्रात का आले नाहीत? याचा अभ्यास जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी केला आहे का? असे सवाल भाजपाने उपस्थित केले आहेत.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींची नवी संकल्पना ‘एक देश, एक पोलीस गणवेश’

आता टाटा प्रकल्पाचे खापरही शिंदे फडणवीस सरकारच्या डोक्यावर

अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी

मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक

कोणताही उद्योग राज्यात स्वतःहून येत नाही, उद्योग धंद्याना वातावरण पोषक हवं. खंडणी उकळून, उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवून, राज्यातील उद्योग धंदे उद्धव ठाकरेंनी बंद करायला लावले. त्याला साथ राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. चार महिन्यात कोणत्याही प्रकल्पाची पायाभरणी होत नाही. यासाठी वर्षे दोन वर्षे प्लॅनिंग, बिडिंग असते. हे मविआच्या ‘त्या’ दोन- तीन पत्रकारांना कळू नये? अशी घाणाघाती टीका भाजपाने केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा