देशातील सुप्रसिद्ध कंपनी डाबर इंडिया आता मसाल्यांच्या व्यवसायात उतरणार आहे. कंपनीने बादशाह मसाला कंपनीचा ५१ टक्के हिस्सा खरेदी केला असून, हा करार जवळपास ५८८ कोटी रुपयांना पार पडणार आहे.
दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे. जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, डाबरने बादशाह मसाला प्रायव्हेट लिमिटेडमधील भागभांडवल मिळविण्यासाठी निश्चित करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानंतर बादशाह मसाला आता डाबर इंडियाच्या मालकीचे असणार आहे. या करारानंतर डाबर इंडियाच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज शेअर दोन टक्क्यांहून अधिक वाढून जवळपास ५४८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
सध्या बादशाह मसाला ग्राउंड मसाले, मिश्रित मसाले आणि खाद्यपदार्थांचे उत्पादन, विक्री आणि निर्यात करते. डाबर इंडियाने बादशाह मसाल्यातील ५१ टक्के हिस्सा ५८७ कोटी ५२ लाख रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली आहे. कंपनीने याबाबत स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे. सध्या या करारानंतर बादशाह मसाला आता डाबर इंडियाकडे असणार आहे. बादशाह मसाल्याचे शंभर टक्के हिस्सेदारीची किंमत एक हजार १५२ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. मात्र सध्या डाबर ५१ टक्के हिस्सा घेत असून उर्वरित ४९ टक्के भागभांडवल ५ वर्षांनंतर विकत घेतले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.
हे ही वाचा:
कॅनडामध्ये भारतीयांना मारहाण करणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना भारतीयांकडून चोख उत्तर
महिला क्रिकेटपटूंना बीसीसीआयची दिवाळीभेट, आता पुरुषांएवढेच मानधन
चित्रपट निर्माता कमल मिश्राने पत्नीला चिरडले
शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन
डाबर इंडियाने अन्न व्यवसाय पुढील तीन वर्षांत पाचशे कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरम्यान, डाबर रेड पेस्टच्या यशस्वी कामगिरीमुळे डाबर कंपनीच्या होम केअर सेगमेंटमध्ये सुमारे २१ टक्के वाढ झाली आहे.