24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरअर्थजगतगुगलला पुन्हा एकदा दणका

गुगलला पुन्हा एकदा दणका

सीसीआयने गुगलला अनुचित व्यापार व्यवस्था बंद करण्याचे निर्देश

Google News Follow

Related

भारतीय स्पर्धा आयोगाने गुगलला पुन्हा एकदा दंड ठोठावला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने यावेळी गुगलवर ९३६.४४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्लेस्टोअर धोरणांबाबत आपल्या पदाचा गैरवापर केल्यामुळे आयोगाने गुगलला हा दंड ठोठावला आहे. यापूर्वी सीसीआयने या अमेरिकन कंपनीला १३३७.७६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. यासोबतच सीसीआयने गुगलला अनुचित व्यापार व्यवस्था बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

गुगलला निर्धारित वेळेत त्यांचे वर्तन बदलण्याचे निर्देश भारतीय स्पर्धा आयोगाने दिले आले आहेत. आयोगाने याआधी देखील गुगलला अँड्रॉइड मोबाईल उपकरण इकोसिस्टममधील मक्तेदारीचा गैरवापर केल्याबद्दल दंड ठोठावला होता. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत गुगलच्या विरोधात आयोगाने केलेली ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे,.

हे ही वाचा:

जो बायडन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष

म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू

ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी

जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद

आयोगाने २० ऑक्टोबर रोजी, गुगलला अँड्रॉइड मोबाइल उपकरणांच्या संदर्भात विविध बाजारपेठांमध्ये आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल १३३७.७६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता आणि शोध इंजिन कंपनीला विविध अनुचित व्यवसाय प्रणाली थांबवण्याचे आणि बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याआधीतत्पूर्वी, भारतीय स्पर्धा आयोगाने गुगलने अँड्रॉइड ओएस द्वारे एप स्टोअरवरील आपल्या मक्तेदारीचा गैरवापर केला असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे

त्यांनी सांगितले की, गुगलने ने अँडॉईड ओएस मध्ये आपली मक्तेदारी वापरून युट्युब च्या माध्यमातून ऑनलाइन व्हिडिओ होस्टिंग प्लॅटफॉर्मवर देखील आपले स्थान मजबूत केले आहे असे आयोगाने म्हटले आहे .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा