उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील भाटपारा २८ क्रमांकाच्या रेल्वे गेटजवळ २५ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास काही मुलांना बॉम्ब पेरलेला दिसला. मुलांनी तो बॉम्ब बॉल म्हणून उचलला आणि त्याच्याशी खेळायला सुरुवात केली. खेळताना स्फोट झाला. या बॉम्बस्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.
सकाळी काही मुलांनी रेल्वे फाटक जवळ बॉम्ब पेरलेला पाहिला. मुलांनी तो बॉम्ब बॉल म्हणून उचलला आणि त्याच्याशी खेळायला सुरुवात केली. तेवढ्यात मोठा आवाज झाला. स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांनी स्फोटात जखमी झालेल्या तीन मुलांना भाटपारा राज्य सामान्य रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी निखिल पासवान या ७ वर्षाच्या मुलाला यांना मृत घोषित केले.
मंगळवारी सकाळी कोलकात्यापासून उत्तरेस ३५ किमी अंतरावर असलेल्या बॅरकपूरजवळ ही घटना घडली. पोलीस आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या बॉम्ब निकामी पथकाने त्याच ठिकाणाहून आणखी एक स्फोट न झालेला क्रूड बॉम्ब जप्त केला. रेल्वे रुळाच्या बाजूला झाडीत बॉम्ब लपवून ठेवण्यात आले होते.
हे ही वाचा:
जो बायडन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष
म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू
ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी
जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद
मंगळवारच्या घटनेवरून राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर भाजपने सत्ताधारी टीएमसीवर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये कोणालाही बॉम्ब आणि इतर शस्त्रे सापडू शकतात. एकेकाळी ही (शस्त्रे) बिहारमधील मुंगेरमध्ये बनवली जायची पण आता ती इथे बनवली जातात. या सर्वांचा उपयोग २०२३ च्या पंचायत निवडणुकीत विरोधकांना शांत करण्यासाठी केला जाईल. निवडणूक किती रक्तरंजित असू शकते हे यावरून सिद्ध होते.