25 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणअखेर उद्धव ठाकरे घराबाहेर पडणार; २३ ऑक्टोबरला संभाजीनगरची भेट

अखेर उद्धव ठाकरे घराबाहेर पडणार; २३ ऑक्टोबरला संभाजीनगरची भेट

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी दौरा

Google News Follow

Related

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अखेर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. २३ ऑक्टोबरला ते संभाजीनगरला जाणार असून तिथे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा आढावा ते घेणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार बाहेर पडल्यानंतर शिवसेना दुबळी झालेली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे विविध जिल्ह्यात दौरा करून शिवसैनिकांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत आपणही महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. पण त्यानंतर त्यांना बाहेर पडता आले नाही.

आता परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पहाणी करून शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे संभाजीनगरला जात आहेत.

मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे . त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे.

हे ही वाचा:

१०० वर्षे जुनी बेरोजगारीची समस्या १०० दिवसांत सुटू शकत नाही

जिंताओ यांना पक्षाच्या बैठकीतून जबरदस्तीने बाहेर काढले, पंतप्रधानांचीही हकालपट्टी

राज्यात ७५ हजार पदांसाठी नोकर भरती करणार

मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा

 

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी घरातूनच काम पाहिल्याची टीका वारंवार होत होती. मंत्रालयातही ते दोन वर्षांतून एकदाच गेले होते. त्यावरूनही विरोधकांनी त्यांना घेरले होते. मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्रात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या त्यावेळीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री या नात्याने लोकांना भेटायला गेले नव्हते. मात्र पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आता शिवसेनाभवनात बैठका घेत आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा