25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेष'हिंदू पंडितांना हुसकावण्यात आल्याने काश्मीरमधील शिक्षण व्यवस्था कोलमडली'

‘हिंदू पंडितांना हुसकावण्यात आल्याने काश्मीरमधील शिक्षण व्यवस्था कोलमडली’

लेफ्टनंट जनरल धिल्लाँ यांनी व्यक्त केले परखड मत

Google News Follow

Related

लष्करातील लेफ्टनंट जनरल कंवलजीतसिंह धिल्लाँ यांनी आपल्या एका मुलाखतीत हिंदू पंडितांना काश्मीरमधून का हुसकावण्यात आले, का त्यांना मारण्यात आले याविषयी भाष्य केले आहे. धिल्लाँ म्हणतात की, हिंदू पंडितांना काश्मीरमधून हाकलून लावण्यात आल्यामुळे तेथील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आली ती मोडकळीस यावी हेच पाकिस्तानचे कारस्थान होते.

काश्मीरमध्ये हिंदू पंडित व काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या विदारक आहेत. काश्मीर फाइल्स चित्रपटांतून ते वास्तव मांडण्यात आले. तेच वास्तव धिल्लाँ मांडतात.

वैभवसिंग यांनी घेतलेल्या या मुलाखतीत ते म्हणतात की, १९८८मध्ये मी काश्मीरला गेलो. त्यावेळी काश्मिरी हिंदूंना पळवून लावण्यात आले. तो भारताच्या इतिहासातील एक बदनामीचा डाग आहे. तेव्हा काश्मीरमधील लोक सीआरपीएफ जवानांना लाथा मारत होते. पुलवामा झाले तेव्हाही मी काश्मीरमध्ये होतो. ३७० हटवले तेव्हा कोअर कमांडर होतो. २०२०नंतर मी तिथून आलो. पण त्यानंतर दगडफेक नाही, हरताळ नाही, आंदोलने नाहीत, याला कारण सरकारची इच्छाशक्ती, त्यांनी उचललेली पावले. सेनादल, जेकेपी, एसओजी, गुप्तचर संघटना, स्थानिक प्रशासन यांनी एकत्र पण काम केले त्याचे हे फलित आहे. ३७०च्या आधी काय झाले आणि नंतर काय झाले. ५ ऑगस्टच्या आधी आणि त्यानंतर याचे उदाहरण सापडणार नाही

देदिप्यमान कारकीर्द असलेले लेफ्टनंट जनरल धिल्लाँ म्हणतात की, जर इतिहास लिहायचे आहे तर इतिहास घडवावा लागेल. मला अभिमान वाटतो की मी त्याचा भाग होतो त्या इतिहासात मी छोटा हिस्सा होतो, असे सांगत धिल्लाँ म्हणाले की, शिक्षण व्यवस्था हे कोणत्याही संस्कृतीत महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृती ५ हजार वर्षे जुनी आहे. तेव्हापासून शिक्षण व्यवस्था आहे. ही व्यवस्था कशी बदलत गेली हा इतिहास आहे. काश्मीरी पंडितांना तिथून हाकलून लावण्यात आले १९९०मध्ये.त्यामुळे शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्थ झाली. तेथे १५० दिवस सगळे बंद असे. मुले शाळेत जात नव्हती. त्यांना पास केले जात असे. पण भविष्यात जेव्हा स्पर्धात्मक परीक्षांत जात तेव्हा त्यात ते नापास होत. कारण त्यांचा पायच कच्चा होता. ही व्यवस्थाच मोडकळीस आली होती. पण सरकारने पावले उचलली. आर्मी स्कूल्स आहेत त्यातील १० हजार मुले शिकतात. ती मुले दहशतवादाकडे जात नाहीत. ती चांगल्या मार्गाला लागली. आज काश्मीरमध्ये चांगले वातावरण आहे. लालचौकात तिरंगा फडकावला जात आहे. काश्मिरमध्ये पर्यटन वाढले आहे. लोकांना नफा मिळतो आहे त्यामुळे आता कुणीही दंगल करणार नाही, दगडफेक करणार नाही. काही लोक आहेत जे अजूनही पाकिस्तानचे समर्थन करत आहेत पण ते फार काळ टिकणार नाहीत. लवकरच ते संपुष्टात येतील.

प्रखर देशभक्त असलेले धिल्लाँ म्हणतात की, काश्मीरच्या समस्येला पाकिस्तान जबाबदार आहे. तेच मूळ आहे. पाकिस्तानी लष्कर त्या कारणीभूत आहे. हा जो धंदा आहे त्यासाठी त्यांना इतकी किंमत चुकवावी लागली पाहिजे की, ते हा धंदा सोडून देतील. त्यांना तीन वेळा विचार करावा लागला पाहिजे. त्यांनी जो त्रास काश्मिरींना दिला आहे तेवढाच त्रास त्यांना व्हायला पाहिजे. कुणीही आमच्या भारताला वाकड्या नजरेने पाहील त्याला तसेच उत्तर दिले जाईल.

हे ही वाचा:

फ्रान्समधील मार्सेलीस येथे उभारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा

संविधान कुणाच्या बापाचे?

वाहने आता बिनधास्त टाका भंगारात

अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच

 

देशभक्त होण्यासाठी लष्करात जाणे किंवा आणखी कोणत्या सेवेत किंवा राजकारणात असणेच आवश्यक नाही. तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल पण त्यातून देशाचे हित होत असेल, तर तुम्ही देशभक्त आहात. आपल्या कामातून देशभक्ती दाखवता येईल, असेही ते म्हणतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा