27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषअजित वाडेकर, दिलीप वेंगसरकरनंतर संदीप पाटीलही 'आऊट', अमोल काळे एमसीएचे अध्यक्ष

अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकरनंतर संदीप पाटीलही ‘आऊट’, अमोल काळे एमसीएचे अध्यक्ष

राजकीय व्यक्तींचा पाठिंबा ठरला सरस

Google News Follow

Related

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे अमोल काळे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे. त्यांच्याविरोधात असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संदीप पाटील यांना मात्र पराभव सहन करावा लागला आहे. अमोल काळे यांना १८१ मते पडली तर संदीप पाटील यांना १५८ मते मिळाली. याआधी, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर असे क्रिकेटपटूही निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उभे राहिलेले आहेत पण राजकीय ताकदीपुढे त्यांनाही हार मानावी लागली.

या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्यामुळे एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. संदीप पाटील यांच्याविरोधात उभे राहिलेल्या अमोल काळे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शरद पवार, भाजपाचे नेते आशीष शेलार आदिंचा पाठिंबा होता. त्यामुळे त्यांचे पारडे आधीपासूनच जड होते. काळे यांच्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रमही निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ठेवण्यात आला होता. त्यावेळी सर्व राजकीय विरोध बाजूला ठेवून राजकारणी मंडळी एकाच मंचावर आली होती.

हे ही वाचा:

बिपिन फुटबॉल अकादमीच्या शिबिरात मुले रंगली

काठमांडूनंतर आता गुजरात भूकंपाने हादरला

पाकिस्तानचे ऐकण्याची गरज नाही, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पाकला सुनावले

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी दिला राजीनामा

 

या निवडणुकीत शरद पवार – आशीष शेलार गटाचे वर्चस्व राहिले. सर्व पदाधिकारी आणि कौन्सिल सदस्यांपैकी ६ जण या पॅनेलमधून निवडून आले तर मुंबई क्रिकेट ग्रुपमधून कौन्सिल सदस्य म्हणून तीन जणांची निवड झाली.

अजिंक्य नाईक हे विक्रमी मतांनी सचिवपदावर निवडून आले. याआधी ते कौन्सिल सदस्य म्हणून काम करत होते. यावेळी दोन्ही गटातून त्यांचेच नाव होते. खजिनदार पदासाठी मात्र चांगलीच चुरस रंगली. मागील कार्यकारिणीत खजिनदार राहिलेले जगदीश आचरेकर मात्र एका मताने पराभूत झाले. त्यांच्यावर अरमान मलिक यांनी मात केली.

कौन्सिल सदस्यांमध्ये जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर ही राजकारणातली मंडळी निवडून आली आहेत.

या निवडणुकीत मिळालेली मते अशी

अध्यक्ष

अमोल काळे १८३

संदीप पाटील १५८

सचिव

अजिंक्य नाईक २८६

मयांक खांडवाला ३५

नील सावंत २०

खजिनदार

अरमान मलिक १६२

जगदीश आचरेकर १६१

खानोलकर संजीव १८

गणेश अय्यर (गव्हर्निंग कौन्सिल सदस्य) २१३

मौलिक मर्चंट १२३

 

अपेक्स कौन्सिल

मिलिंद नार्वेकर २२१

निलेश भोसले २१९

गोडबोले कौशिक २०५

अभय हडप २०५

सूरज समत १७०

जितेंद्र आव्हाड १६३

मंगेश साटम १५७

संदीप विचारे १५४

प्रमोद यादव १५२

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा