25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाओशिवऱ्यात सापडल्या तलवारी; एकाला केली अटक

ओशिवऱ्यात सापडल्या तलवारी; एकाला केली अटक

अंधेरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाई मुळे मुंबईत खळबळ

Google News Follow

Related

मुंबईतील ओशिवरा परिसरात एका घरातून मुंबई गुन्हे शाखेने ६ तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखेने सय्यद मजिद आलम उर्फ विकी याला अटक केली आहे. अंधेरी येथे होणाऱ्या पोट निवडणुकीपूर्वी ओशिवऱ्यात मिळून आलेल्या शस्त्रास्त्रांमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरातील ओशिवरा येथील राममंदिर रोड वरील गुलशन नगर येथील एका घरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ला मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने कक्ष ९ च्या पथकाने गुलशन नगर येथे एका घरावर छापा टाकून सय्यद मजिद आलम उर्फ विकी याला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता घरात लपवून ठेवलेल्या ६ तलवारी मिळून आल्या आहे.

हे ही वाचा:

पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

पाऊस पुण्यात पुणे पाण्यात

 

याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सय्यद आलम याला अवैध शस्त्रसाठा बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सय्यद हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

अंधेरी येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओशिवऱ्यात मिळून आलेल्या तलवारीमुळे एकच खळबळ उडाली असून या तलवारी नक्की कशासाठी आणण्यात आल्या होत्या, यामागे कुठला मोठा कट होता का याचा तपास सूरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा