25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषआमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

बाळासाहेबांच्या शिवसेनेतील औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे.

Google News Follow

Related

बाळासाहेबांच्या शिवसेनेतील औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना औरंगाबादहून मुंबईला आणण्यात येत आहे. एअर ऍम्ब्युलन्सने संजय शिरसाट यांना मुंबईला आणण्यात येत असून ते मुंबईसाठी रवाना झाले आहेत, अशी माहिती आहे.

काही दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती ठीक नसल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर काल त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दुपारच्या सुमारास दाखल करण्यात आलं होतं. अस्वस्थ वाटत असल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. त्यानंतर २४ तासांच्या आतच त्यांना औरंगाबादहून मुंबईल उपचारासाठी नेलं जावं, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने दिला. त्यामुळे शिरसाट यांना मुंबईतल्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

हे ही वाचा

नायजेरियात महापुराची तयारीच नसल्याने गमावले शेकडो जीव

सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीच्या आत्महत्येचे कारण आले समोर

बाळासाहेबांच्या शिवसेनेतील ‘या’ आमदराकडून अंधेरी पोट निवडणुक बिनविरोध करण्याची मागणी

बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत

संजय शिरसाट यांना औरंगाबाद विमानतळावर आणण्यात आलं तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यांच्या प्रकृतीबद्दल नक्की माहिती समोर आलेली नाही. संजय शिरसाट यांना मुंबईतल्या कोणत्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा