पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी पाकिस्तानबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तान भारत आणि बांगलादेशच्या मागे का पडला आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. इस्माईल म्हणाले, “बांगलादेशींचे सरासरी वय पाकिस्तानी लोकांपेक्षा पाच वर्षे जास्त आहे. प्रत्येक बांगलादेशीने पाकिस्तानी लोकांपेक्षा तीन वर्षे जास्त अभ्यास केला आहे. पाकिस्तान सरकारने चूक केली आहे. भारताकडे ६०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त परकीय चलन साठा आहे आणि पाकिस्तानकडे १० अब्ज डॉलर्सही नाहीत.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यानंतर शाहबाज शरीफ पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी मिफ्ताह इस्माईल यांना अर्थमंत्री केले. मिफ्ताह इस्माईल हे केवळ काही महिने अर्थमंत्री होते पण या काळात त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले.
मिफ्ताह इस्माईल म्हणाले, “संपूर्ण जगात भारताचा आदर आहे. भारत १५० अब्ज डॉलर्सची निर्यात करतो. पाकिस्तान आणि भारताने एकत्र सुरुवात केली होती. अगदी ९० च्या दशकापर्यंत पाकिस्तान भारताच्या पुढे होता. पण आज आम्ही आमच्या लोकांना काय दिले? पाकिस्तानातील ५०% मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. देशाचे काय करत आहात? हा प्रश्न विचारायला हवा.
पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री म्हणाले, “प्रत्येक मौलवीला घाबरता. त्यांचा वापर ते मते घेण्यासाठीही करतात. पाकिस्तानात लष्करी राजवट असो वा राजकीय राजवट, पण ती सोडवण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. वाढत्या लोकसंख्येची समस्या कोण सोडवणार? मुलांना शाळेत कोण पाठवणार? काही न करणे ही पाकिस्तानची संस्कृती बनली आहे. पाकिस्तानच्या राजकारणातील लष्कराची भूमिका आपल्याला कमी करावी लागेल, असं मत त्यांनी मांडले आहे. भारत पाकिस्तानपेक्षा आठपट जास्त सैन्यावर खर्च करतो. त्यामुळे बरोबरी नाही आहे. भारताला आज जगात खूप मान आहे, असंही ते म्हणाले.
हे ही वाचा
खोटी बातमी दिल्याप्रकरणी लोकसत्ता, संपादक गिरीश कुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
भाजपाची माघार, ऋतुजा लटके बिनविरोध
बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत
रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’
पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला आहे. पाकिस्तान सध्या वेगवेगळ्या सावकारांच्या मदतीने आपली अर्थव्यवस्था चालवत आहे. पाकिस्तानमध्ये भीषण पूर आला होता आणि त्याच्या उद्ध्वस्ततेमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.