25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामासुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीच्या आत्महत्येचे कारण आले समोर

सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीच्या आत्महत्येचे कारण आले समोर

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार, १६ ऑक्टोबर रोजी घडल्याचे समोर आले आहे.

Google News Follow

Related

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार, १६ ऑक्टोबर रोजी घडल्याचे समोर आले आहे. वैशालीने इंदौरमधील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. वैशालीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर तेजाजी नगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैशाली ही सुशांतसिंग राजपूत याची मैत्रीण होती त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. दरम्यान वैशाली हिने आत्महत्या केल्यानंतर एक सुसाईड नोट सापडली आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या माहितीनुसार, “वैशाली ही मागच्या काही काळापासून तणावाखाली होती. वैशालीला तिचा एक्स बॉयफ्रेंड त्रास देत होता. त्याच्या त्रासाला ती खूप कंटाळली होती,” असे चिठ्ठीत लिहिल्याची माहिती आहे.

वैशालीच्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये वैशालीने चाहत्यांना तिच्या साखरपुड्याची माहिती दिली होती. त्यानंतर जवळपास महिन्याभरातच वैशालीने तिचं लग्न रद्द झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती.

वैशालीने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यात तिने संजनाची भूमिका साकारली होती. तसेच ‘ये है आशिकी’, ‘ससुराल सिमर का’, ‘लाल इश्क’ आणि ‘विश और अमृत’ या मालिकांमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘ससुराल सिमर का’ मधील तिच्या पात्रासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नकारात्मक भूमिकेसाठी गोल्डन पेडल पुरस्कार मिळाला होता.

हे ही वाचा

बाळासाहेबांच्या शिवसेनेतील ‘या’ आमदराकडून अंधेरी पोट निवडणुक बिनविरोध करण्याची मागणी

बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

वैशाली दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची खूप चांगली मैत्रीण होती. सुशांतसोबतचा तिचा फोटो व्हायरल होत आहे, जो तिने सुशांतच्या मृत्यूंनंतर शेअर केला होता. “नाही, नाही, मी रडणे थांबवू शकत नाही, कोणीतरी मला सांगेल की हे एक स्वप्न आहे, सुशांत एक अद्भुत व्यक्ती आणि अभिनेता होता,” असे तिने लिहिले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा