डॉ.ए .पी .जे. अब्दुल कलाम म्हणजे वैज्ञानिक, राष्ट्रपती याबरोबरच देशाचे मिसाईलमॅन म्हणून त्यांची ओळख सर्वांनाच माहिती आहे. पण त्याही पलीकडे जाऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असे अनेक पैलू आहेत ज्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्वआणखी महान ठरते. तरुणांना प्रोत्साहन देणारे ते तर होतेच पण त्यांच्यातील साधेपणा, काटकसर आणि प्रामाणिकपणा सारखे गूण आजच्या राजकीय परिस्थितीत दुर्मिळ झाले आहे. माजी राष्ट्रपती ए. पी .जे अब्दुल कलाम यांची आज जयंती. त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही वेगळे पैलू जाणून घेऊ.