25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरधर्म संस्कृतीगोमांस खाण्याची सक्ती आणि मारहाण करून केले धर्मांतरण

गोमांस खाण्याची सक्ती आणि मारहाण करून केले धर्मांतरण

एकूण १२जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Google News Follow

Related

दलित तरुणाचे सक्तीने इस्लाममध्ये धर्मांतर केल्याप्रकरणी कर्नाटकात आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक माजी काँग्रेस नगरसेवक आहे. याप्रकरणी एकूण १२जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित श्रीधर गंगाधरने बळजबरीने मुस्लिम बनवल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर ही बाब नुकतीच उघडकीस आली .
गंगाधर हा कर्नाट्कधील मांड्या जिल्ह्यातील मद्दुर येथील  रहिवासी आहे.

अत्तावर रहमान आपल्याला बंगळुरू येथील बनशंकरी मशिदीत घेऊन गेला होता. तेथे आपणास इस्लामिक पद्धतीचे शिक्षण देण्यात आले. गोमांस खाण्याची सक्ती केली असं फक्रारीत म्हटलं आहे. त्याने नकार दिल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याची सुंता झाली. त्याचे नाव बदलून मोहम्मद सलमान ठेवण्यात आले. तक्रारीनुसार, आरोपींनी गंगाधर यांना दररोज तीन हिंदूंचे धर्मांतर करण्याचे टार्गेटही दिले होते. तसे न केल्यास तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. त्यासाठी आरोपींनी शस्त्र देऊन गंगाधरचा फोटो काढला होता. हा फोटो अन्य हिंदूंचे धर्मांतर न केल्यास पोलिसांना देण्याची धमकी देण्यात आली होती.

हे ही वाचा:

राणा आयुबचे ईडीने १ कोटी ७७ लाख रुपये गोठवले

आमिरवर जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात बॅनर झळकले

काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले

मशिदीत घेऊन गेलेल्या रहमानला गंगाधर सुमारे अडीच वर्षांपासून ओळखतात. आर्थिक मदतीच्या नावाखाली रहमानने त्यांना आमिष दाखवून मशिदीत आणले होते. रहमान त्यांना प्रथम बनशंकरी मशिदीत घेऊन गेला. तेथे त्यांची अजीज साब यांची भेट झाली. गंगाधरच्या म्हणण्यानुसार, अजीजने मशिदीत हिंदू देव-देवतांबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी बोलल्या होत्या. त्यानंतर त्यांना बेंगळुरू, तिरुपती आणि लगतच्या भागातील अनेक मशिदींमध्ये नेण्यात आले. त्यांना कुराण आणि नमाज वाचण्यास आणि इस्लामिक पद्धती शिकण्यास भाग पाडले गेले.

हे ही वाचा:

राणा आयुबचे ईडीने १ कोटी ७७ लाख रुपये गोठवले

आमिरवर जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात बॅनर झळकले

काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ५५ वर्षीय माजी नगरसेवक अन्सार पाशा यांचाही समावेश आहे. ते काँग्रेसशी संबंधित आहेत. ते स्थानिक आमदाराच्या जवळचे असल्याचेही बोलले जाते. अन्सारचे मित्र नयाज पाश आणि अझीझ साब यांनाही अटक करण्यात आली आहे. अत्तावर रहमान आणि शब्बीर खान अशी अटक केलेल्या अन्य दोन आरोपींची नावे आहेत.

अटक आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या संदर्भात हुबळी येथे ९ सप्टेंबर रोजी १२ जणांविरुद्ध प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हे प्रकरण बनशंकरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा