राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गटातील अनेक आजी माजी नगरसेवक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. आता पुन्हा राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुरेष म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच सुरेश म्हात्रे यांना बाळासाहेबांच्या शिवसेनकडून मोठी जबाबदारी देखील देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे यांनी गुरुवार, १३ ऑक्टोबरला युती सरकारची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी त्यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे नियुक्तीचे पत्र सुरेश म्हात्रे यांना सुपूर्द करण्यात आले अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी काल भेट घेऊन युती सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.याबाबतचे नियुक्तीचे पत्र बाळ्यामामा यांना सुपूर्द करण्यात आले pic.twitter.com/Q5kpohYjlh
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 14, 2022
सुरेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, माजी आमदार अशोक पाटील, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, शहापूर शहरप्रमुख आकाश सावंत तसेच मुरबाड-शहापूर तालुक्यातील सर्व शिवसेना प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे ही वाचा:
न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर
राणा आयुबचे ईडीने १ कोटी ७७ लाख रुपये गोठवले
आमिरवर जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात बॅनर झळकले
एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंड केल्याने उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. मग राज्यात सत्तानंतर झाले आणि कालांतराने उरलेल्या १२ आमदारांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. पुढे मग नगरसेवक कार्यकर्ते हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. आता राष्ट्रवादीला खिंडार पडायला सुरुवात झाली आहे.