24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषमाथेरानमध्ये १५० वर्षांनी हातरिक्षाच्या जोखडातून सुटका

माथेरानमध्ये १५० वर्षांनी हातरिक्षाच्या जोखडातून सुटका

माथेरानमध्ये धावणार आता या 'गाड्या'

Google News Follow

Related

थंड हवेचं ठिकाण म्हटलं तर आपसूकच पाहिलं नाव येतं ते म्हणजे रायगड जिल्ह्यातील माथेरान हे ठिकाण, याच माथेरानमध्ये निसर्गरम्य वातावरणाची मज्जा लुटण्यासाठी पर्यटक येत असतात. मात्र तिथे ‘इको सेसिटिव्ह झोन’ असल्यामुळे पर्यटकांना इथे इंधनावर चालणाऱ्या वाहन घेऊन फिरता येत नाही. त्यामुळे माथेरान भागात पर्यटकांना फिरण्यासाठी अथवा स्थानिक रहिवाशांच्या सामानाची ने-आण करण्यासाठी हातरिक्षाचा वापर केला जातो. अजूनही माथेरानमध्ये पोटापाण्यासाठी हातरिक्षावाल्यांची चौथ्या पिढीचा संघर्ष चालू आहे. तसेच तेथील स्थानिक लोकांचे व्यवसाय हे पर्यटकांवर अवलंबून आहे. अशातच आता माथेरानमध्ये प्रायोगिक तत्वावर ई-रिक्षा चालवण्यासाठी सरकारने परवागी दिली आहे. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटन व्यवसायाचे वेग वाढण्याची शक्यता आहे.

मानवी शक्तीचा वापर करून, हात रिक्षा चालवली जाते. त्यामधे आता लाल रस्त्यावरून ई-रिक्षा धावताना दिसणार आहे. तसेच माथेरानमध्ये हातरिक्षा चालवण्याची मुदत १५ ऑक्टोंबर पर्यत संपणार आहे. त्यानंतर प्रायोगिक तत्वावर एकूण सात ई-रिक्षा चालवण्यात येणार आहे. तसेच ई-रिक्षासाठी महिंद्रा कंपनीकडून ३५ लाख रुपये खर्च करून ई-रिक्षा देण्यात आल्या आहेत. ई-रिक्षासाठी तिकित दरसंदर्भात आरटीओ विभागाशी पत्रव्यवहार सुरू असून, तिकीट दर पर्यटकांना परवडणारे असतील. तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी ई रिक्षा प्रकल्प राबवला जात आहे. असे मत सुरेखा भणगे, मुख्याधिकारी माथेरान पालिका यांनी मांडली. तसेच माथेरान मध्ये ४६० घोडे आहेत. राजकीय हेतूसाठी यामध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. ई-रिक्षाचा त्यांच्या व्यवसायावर फारसा परिणाम होणार नाही. त्यांच्यासाठीच्या उपाययोजना आराखडा तयार करून ठेवले आहेत. अशी माहिती अश्व पालन संघटनाचे मनोज खेडेकर यांनी दिली.

हे ही वाचा:

मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक

इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक

ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा

उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

माथेरानमध्ये डोंगर दऱ्यावर वयोवृद्धाना चढणे शक्य होत नाही. त्यासाठी घोड्यांचा किंवा हातगाडी रिक्षांचा वापर केला जातो. दादरमध्ये ३० वर्ष शिक्षकांची नोकरी करून, निवृत्त झालेले शिक्षक सुनील शिंदे यांनी माथेरानमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. माथेरानमध्ये त्यांचे लहानपणीचे जूने मित्र अजूनही हातरिक्षा ओढण्याचे काम करत आहेत. हे पाहून शिंदे यांचे मन हेलावलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने प्रायोगिक तत्वावर ई-रिक्षा चालवण्याचा परवानगी दिली. आता माथेरानमध्ये ९४ परवानाधारक हातरिक्षा चालक असून, त्यानाही आता ई-रिक्षा व्यवसायात सामावून घेण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा