अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चक्क भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असल्याने त्यांच्या हातमिळवणीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक शिष्टमंडळ आज, १३ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान गेले. मातोश्रीवर झालेल्या भेटीत या शिष्टमंडळाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दर्शवला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, मुंबई सचिव मिलिंद रानडे, प्रकाश नार्वेकर, विजय दळवी, बबली रावत यांचा समावेश होता. भाकपच्या शिंष्टमंडळाची भेट शिवसेनेच्या खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आमदार रविंद्र वायकर, सुनील प्रभू, रमेश कोरगावंकर यांनी घेतली.
हे ही वाचा:
‘ते’ एसटी कर्मचारी सेवेत येणार असल्याचा जल्लोष
मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक
हिजाब बंदीवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमध्ये मतभेद, आता मोठ्या खंडपीठात होणार सुनावणी
ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनेसुद्धा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठींबा दर्शवला आहे. दरम्यान. उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाची विचारधारा सोडली असल्याचे आरोप नेहमी होत असतात. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले अशा अनेक टीका त्यांच्यावर होत असतात. यात आता गेल्या ५० वर्षांपासून हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या पक्षाशी उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केली आहे. कम्युनिस्ट पक्ष हा हिंदुत्वाच्या विचारसरणीला सातत्याने विरोध करत असतो. मुंबईमध्ये हे दोन्ही पक्ष एकेकाळी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते.