काशीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी, सार्वजनिक वाहतुकीसाठी सीएनजी बोटी आणि सीएनजी ऑटो आणि इलेक्ट्रिक बस आधीच गंगेच्या विविध मार्गांवर धावत आहेत. लवकरच गंगेत मिनी सोलर लक्झरी क्रूझही धावणार आहे. ज्या पर्यटकांना काशी विश्वनाथ धामला जायचे आहे त्यांच्यासाठी ही क्रूझ खास असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील गंगा नदीमध्ये पर्यटकांना लवकरच मिनी सोलर लक्झरी क्रूझचा आनंद लुटता येणार आहे. या क्रूझच्या ठरलेल्या ठिकाणाहून पर्यटकांना फक्त काशी विश्वनाथ धामला भेट देता येऊ शकेल.
सौरऊर्जेवर चालणारी मिनी लक्झरी क्रूझ पर्यावरण बचतीसाठी खूप मोठी मदत करेल. ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या क्रूझमध्ये एकावेळी सुमारे २५ ते ३० लोक प्रवास करू शकतील. संपूर्ण क्रूझ वातानुकूलित असेल. यामध्ये कॅफेटेरिया आणि बायो टॉयलेटसोबतच सुरक्षेच्या आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन केले जाणार आहे. क्रूझने गंगेला भेट देण्यासाठी अलकनंदाच्या वेबसाइटवर जाऊन बुकिंग करावे लागेल. काशी विश्वनाथ धाम पाहण्यासाठी येणारे पर्यटक क्रूझ आणि रोरो बोटीतून गंगाहून काशीला भेट देण्यास प्राधान्य देत आहेत.
हे ही वाचा:
इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक
ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा
उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल
अलकनंदा आणि भागीरथी या क्रूझच्या माध्यमातून गंगेतील रविदास घाटापासून राजघाटापर्यंत सकाळ आणि संध्याकाळचे फेरफटका मारत आहेत. नमो घाट आणि संत रविदास घाट येथून मिनी लक्झरी क्रूझ चालवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येत आहे. मंजुरी मिळाल्यानंतर पर्यटकांसाठी क्रूझ ऑपरेशन सुरू केले जाईल.