रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजून संपायचं नाव घेत नसताना आता पुन्हा रशियाने युक्रेनवर हल्ला करायला सुरूवात केली आहे. यामध्ये अनेक युक्रेनच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली. दरम्यान, संयुक्त राष्ट्रामध्ये युक्रेनने रशियाचा दहशतवादी देश म्हणून उल्लेख केला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत युक्रेनकडून रशियाचा दहशतवादी देश म्हणून उल्लेख केला गेला. रशियाने सतत केलेल्या हल्ल्यामुळे हा आरोप केल्याचं सांगण्यात येत आहे. या युद्धात दोन्ही देशांचं मोठं नुकसान होत असून रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांची आर्थिक आणि जीवितहानी झाली आहे.
Ukraine denounces Russia as 'terrorist state' at UN meeting, reports AFP
— ANI (@ANI) October 10, 2022
रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर मिसाईल्स हल्ले केले आहेत. राजधानी किव्हवर ७५ क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले होते. त्यापैकी ४१ क्षेपणास्त्र युक्रेनच्या हवाई दलाने पाडले आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कार्यालयावरही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा:
“बहुमत असून धनुष्यबाण मिळालं नाही याची खंत”
आशिष शेलार उतरले मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीच्या मैदानात
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल
चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, “संपूर्ण युक्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये अनेक लोक ठार आणि जखमी झाले आहेत. तसेच रशिया आम्हाला नष्ट करण्याचा आणि पृथ्वीतलावरून आम्हाला पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत.”