मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी त्यातील रंग वाढू लागली आहे. बाळ महाडदळकर गटाचे नाव बदलून ते शरद पवार गट करण्यात आल्यानंतर या गटातून माजी क्रिकेटपटू संदीप पाटील अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार होते. मात्र मुंबई भाजपाचे अध्यक्ष व एमसीएचे माजी अध्यक्ष आशीष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आणि सगळी सूत्रे फिरली. शरद पवार गट आणि आशीष शेलार गट एकत्र आले. मात्र आशीष शेलार आणि संदीप पाटील हे दोघेही अध्यक्षपदाची निवडणूक कशी लढविणारा असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता शरद पवारांचे या गटाला असलेले नावच बदलण्यात आले आहे. आता हा गट मुंबई क्रिकेट ग्रुप या नावाने ओळखला जाणार आहे. त्यातील सर्व उमेदवार मात्र आहे तेच आहेत. त्यामुळे संदीप पाटील हे अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. ते आशीष शेलार यांना आव्हान देऊ शकतील.
अध्यक्षपदासाठी संदीप पाटील हे उभे राहात असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना आव्हान असेल ते मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आशीष शेलार यांचे. मात्र आता संदीप पाटील यांच्यासोबत असलेला गट शरद पवार गट म्हणून ओळखला जाणार नाही. या गटाने आपली बैठक घेतली आणि त्यात गटाचे नाव बदलून मुंबई क्रिकेट ग्रुप असे केले.
याआधी बाळ महाडदळकर गटही फुटला. महाडदळकर यांचे नाव काढून घेतल्यानंतर त्या गटाला शरद पवार गट असे नाव देण्यात आले पण आता पवारांचे नावही गटातून काढण्या आले आहे.
हे ही वाचा:
‘शिवसेना’ नाव प्रबोधनकारांनी ठेवले की आचार्य अत्रेंनी?
सिद्धू मुसेवाला हत्येतील आरोपीच्या प्रेयसीला मुंबईत अटक
म्हणून लोकलमध्ये महिलांमध्ये होते हाणामारी
युक्रेनवर ७५ क्षेपणास्त्रांचा मारा, शेकडो ठार
मुंबई क्रिकेट ग्रुपचे उमेदवार असे
अध्यक्ष : संदीप पाटील
उपाध्यक्ष : नवीन शेट्टी
सचिव : अजिंक्य नाईक
संयुक्त सचिव : गौरव पय्याडे
खजिनदार : जगदीश आचरेकर
अपेक्स कौन्सिलसाठी पुढील उमेदवार
अभय हडप, कौशिक गोडबोले, संदीप विचारे,
प्रशांत सावंत, विघ्नेश कदम, दाऊद पटेल, राजेश महंत, सुरेंद्र हरमळकर, सुरेंद्र शेवाळे.
गव्हर्निंग कौन्सिल
कार्याध्यक्ष : इक्बाल शेख, सदस्य : मौलिक मर्चंट