एकीकडे विविध सभांमध्ये शिवसेना हे नाव कसे आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी ठेवल्याचे दाखले दिले जात असले तरी खरोखरच हे नाव प्रबोधनकारांनी ठेवले आहे का, यावर आता चर्चा होऊ लागली आहे. याबाबत आता आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ या दैनिकाचा एक फोटो व्हायरल होतो आहे.
या दैनिकाच्या पहिल्या पानावर आचार्य अत्रे यांची महाराष्ट्राला हाक, शिवसेना उभारा! असा मथळा दिसतो. या दैनिकाच्या या पहिल्या पानावर तारीख दिसते ती १९ जुलै १९५९. त्यावेळीच अत्रे यांनी शिवसेना या शब्दाचा वापर केला होता.
मराठा वर्तमानपत्राच्या पहिल्या पानाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यात म्हटले आहे की, शिवसेना हे नाव बाळासाहेबांनीही दिले नाही आणि प्रबोधनकारांनीही. ते नाव आचार्य अत्रे यांनी दिले. याचसंदर्भात दिव्य मराठीने बातमी दिली असून त्याची लिंकही या ट्विटसोबत जोडलेली आहे. त्यात असेही म्हटले आहे की, शिरीष पै यांच्या वडिलांनी म्हणजेच आचार्य अत्रे यांनी दिलेले नाव ठाकरे वापरत आहेत. म्हणजे शिरीष पै यांचा बाप पळविण्यात आला आहे.
हे ही वाचा:
डोंबिवलीत खाणकामाच्या जागी पाण्यात पडून २ बालके दगावली
सिद्धू मुसेवाला हत्येतील आरोपीच्या प्रेयसीला मुंबईत अटक
पुरग्रस्तांना वाचवणारी नाव उलटून ७६ जणांचा मृत्यू
२० कोटीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या गजा मारणेच्या सदस्यांना अटक
सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे चिन्ह आणि नाव यावरून सध्या वादविवाद सुरू असून शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह व शिवसेना हे नाव गोठवण्यात आले आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्ह आणि नाव मिळणार आहे. त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही.
त्यावरून दोन्ही गटांनी तीन तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे दिली आहेत. तसेच तीन नावेही देण्यात आली आहेत. आता त्यातून कोणते चिन्ह आणि नाव आयोगाकडून देण्यात येते हे पाहायचे.
यासंदर्भात भाजपा नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, सोशल मीडियाच्या जमान्यात कोणाच्याही थापा पचत नाहीत. शिवसेना हे नाव आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी सर्वात आधी जाहीर केलं… जनाब हे आपल्या माहितीसाठी…
सोशल मीडियाच्या जमान्यात कोणाच्याही थापा पचत नाहीत. शिवसेना हे नाव आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी सर्वात आधी जाहीर केलं…
जनाब हे आपल्या माहितीसाठी… pic.twitter.com/qpHeDR0KEc— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 10, 2022