शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नव्याने काही आरोप केले आहेत. पवार हे २०१४ पासून शिवसेना बुडवण्याचा प्रयत्न करीत होते. लोकांना वापरायचे आणि सोडून द्यायचे हे पवारांचे कामच आहे. ते बर्म्युडा ट्रँगल आहेत, असा घणाघात शिवतारे यांनी केला आहे.