पुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी आलेली नाव उलटून ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियातील अंबरा राज्यात ही दुर्घटना घडली आहे. पुरात अडकलेल्या ८५ लोकांना वाचवण्यासाठी ही बोट आली होती. ही बोट ८५ जणांना घेऊन जात होती. नायजेरियाचे राष्ट्रपती मुहम्मदु बुहारी यांनी घटनेची माहिती मिळताच शोक व्यक्त केला आहे.
नायजेरियाच्या अध्यक्षांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, देशातील अंबरा प्रदेशात वाढत्या पुरामुळे ८५ जणांना घेऊन जाणारी एक बोट पलटी झाली असून आपत्कालीन सेवा केंद्राने ७६ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. या दुर्घटनेच्या वृत्तानंतर नायजेरिया सरकारने बचावकार्याला वेग दिला आहे. तुम्हाला सांगतो की, या दुर्घटनेनंतर नायजेरियन जलमार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने बचाव कार्य वेगाने सुरू केले आहे. राष्ट्रपतींनी इतर सर्व बचाव आणि मदत यंत्रणांना अपघातस्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉल तपासण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत .
हे ही वाचा:
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल
चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच
उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर
अरुण गोविल काय म्हणाले ‘आदिपुरुष’ बद्दल
अध्यक्ष बुहारी यांनी बोट दुर्घटनेमुळे दु:ख झाल्याचे सांगितले आणि सर्व प्रवाशांसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. राष्ट्रपती चार्ल्स सोलुडो यांनी या दुःखद अपघातात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो असे म्हटलं आहे.राष्ट्रपतींनी पूरग्रस्त भागातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे . सरकार आणि अंबरा राज्यातील लोकांसाठी हा पूर एक धक्का असल्याचं ते म्हणाले. पावसाळा सुरू झाल्यापासून पश्चिम आफ्रिकन राष्ट्रातील अनेक भाग पुरामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. आपत्कालीन सेवांनुसार ३०० पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत आणि किमान एक दशलक्ष बेघर झाले आहेत.