24 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरराजकारणसंजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत चित्रा वाघ...

संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत चित्रा वाघ गप्प बसणार नाही

Google News Follow

Related

नाशिक येथे भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. पूजा चव्हाण हिच्या मृत्युप्रकरणाशी निगडीत अनेक बाबींवर त्यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी ही केस योगायोगांची केस असल्याचे देखील म्हटले आहे.

हे ही वाचा: 

दख्खनेत कसा आला हिंदूद्वेष्टा औरंगजेब

यावेळी चित्रा वाघ यांनी काही प्रश्न उपस्थित केले.

  • पूजा चव्हाण हीच्या फोनमध्ये ४५ मिस्ड कॉल देणारा संजर राठोड कोण?
  • १०० क्रमांकावर केल्या गेलेल्या फोनची नोंद का घेतली गेली नाही आणि त्यानंतर अरूण राठोड यांना कोणत्या अधिकारात ९१४६८७०१०० हा क्रमांक दिला?
  • त्याबरोबरच हा क्रमांक कोणाचा आहे? या क्रमांकावर अरूण राठोड आपला कबूली जबाब देत असताना अजून तिसऱ्या व्यक्तीला पण कॉन्फरन्स कॉल द्वारे जोडून घेण्यात आलं तो कोण?

या पत्रकार परिषदेत पोलिसांनी अजूनही एफआयआर दाखल केली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून त्यांनी सरकारवर हल्ला चढवताना ‘ही शिवशाही नाही ही तर मोगलाई आहे’ असे म्हटले आहे. सरकारवर टिका करताना त्यांनी ‘एका बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी सर्व नेतेमंडळी एकत्र झाल्याचे’ देखील म्हटले आहे.

त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र याची एफआयआरची कॉपीसुद्धा एआयबीने दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय एआयबीकडून व्हॉट्सऍप वर नोटिस पाठवली गेल्याचे देखील त्या म्हणाल्या. याच संदर्भात ‘न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, ती या सरकारसारखी मुर्दाड नक्कीच नाही’ असे त्या म्हणाल्या. ‘माझ्यावर, माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करा, धमक्या द्या, फोन करा, फोटो मॉर्फ करा काय करायचं ते करा, पण मी गप्प बसणार नाही’ असेही त्यांनी ठणकावून सांगितले. एसीबीकडून छळ केला जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते, जर फक्त शिवसेनाप्रमुख असते तर या बलात्काऱ्याला फाडून खाल्ला असता’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे’ या वाक्याचा त्यांनी वारंवार पुनरुच्चार केला. त्याबरोबरच ‘संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत चित्रा वाघ गप्प बसणार नाही.’ असेही त्यांनी सांगितले. ढळढळीत पुरावे असतानाही एफआयआर का दाखल केली जात नाही असा सवालही त्यांनी केला.

चित्रा वाघ यांनी बंजारा समाजाबद्दल आदर देखील व्यक्त केला. ‘वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यासारखी रत्न या समाजाने महाराष्ट्राला दिली, आणि कुठे हे…’ असे त्या म्हणाल्या. ‘त्याबरोबरच बलात्काऱ्याला जात नसते’ असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याबरोबरच, बंजारा समाजातील अनेकांनी आम्ही संजय राठोडच्या पाठीशी उभे नसल्याचे देखील त्यांना कळवले असल्याचे त्यांनी उघड केले.

संजय राठोडच्या शक्तिप्रदर्शनाने पोहरादेवी गावात कोरोनाची लागण झाली तर त्याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी केला. त्याउलट मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा