30 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेष‌लडाखमध्ये दरड कोसळून दोन जवान ठार

‌लडाखमध्ये दरड कोसळून दोन जवान ठार

दोन लष्करी जवानांचा जागीच मृत्यू

Google News Follow

Related

लडाख प्रदेशातील तुर्तुक सेक्टरमध्ये झालेल्या मोठ्या भूस्खलनात लष्कराचे दोन जवान ठार आणि सहा जण जखमी झाले, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने रविवारी दिली. चौकीवर कार्यरत असलेल्या दोन लष्करी जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच नेपाळी पोर्टर्ससह अन्य एक सैनिक जखमी झाला.

शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला असून, त्यात लष्कराच्या तीन वाहनांवर दरड कोसळली. लष्कराची तिन्ही वाहने लडाखच्या पुढे जात असताना हा अपघात झाला.भारतीय हवाई दलाची दोन हेलिकॉप्टरन शोध मोहिमेत मदत करण्यासाठी उत्तराखंडमधील हर्षित येथे रवाना झाली आहेत. जखमींना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात नेण्यात आले आहे . या घटनेत पूलासह आणखी एक लष्करी बंकर, मंदिर, एक खासगी कार आणि सिव्हिल गॅरेजचे पूर्ण नुकसान झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये उत्तराखंडमधील उत्तरकाशीमधील भैरव घाटी आणि नेलॉन्ग दरम्यान भूस्खलनात एक जवान शहीद झाला होता. या गस्ती पथकातील एक डॉक्टर जखमी झाला. याशिवाय इतर काही जवानांना वाचवण्यात यश आले आहे. दुसरीकडे, उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये आणखी तीन जणांचे मृतदेह सापडल्याने हिमस्खलनात मृतांची संख्या १९ वर पोहोचली आहे. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगने शुक्रवारी ही माहिती दिली.

हे ही वाचा:

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार

मेस्सी म्हणतो हा माझा शेवटचा विश्वचषक

मंगळवारी एनआयएमचे गिर्यारोहक गिर्यारोहण करून परतत असताना १७ हजार फूट उंचीवर असलेल्या द्रौपदीच्या दांडा-२ शिखराला हिमस्खलनाचा तडाखा बसला. एनआयएमने सांगितले की, हिमस्खलन झालेल्या ठिकाणाहून गुरुवारी संध्याकाळी आणखी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आतापर्यंत १९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा