शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग उद्या निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने चार ऑक्टोबरला निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अंधेरी पोटनिवडणूक जाहीर झालेली लक्षात घेता यावर निवडणूक आयोग लवकर निर्णय जाहीर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर केला जातोय असाही दावा करतानाच शिंदे गटाकडून चिन्हाबाबत तात्काळ सुनावणी घ्या, अशी विनंती निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे आकडेवारी सादर करताना त्यांच्या पक्षात आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, राज्य प्रमुख, मूळ सदस्य, पदाधिकारी सर्व आपल्या बाजूने असल्याचं म्हटलं आहे.
हे ही वाचा:
चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित
बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू
‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’
मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल
उद्धव ठाकरे गटाने देखील चिन्हासाठी निवडणुक आयोगाला पत्र दिले आहे. उर्वरीत कागदपत्रे ७ ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश निवडणुक आयोगाने उद्धव ठाकरेंना दिले आहेत. परंतु उद्धव ठाकरे गटाने ही कागदपत्रे अद्याप निवडणूक अयेगाला सादर केलेली नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगानं वारंवार मुदत देऊनही ठाकरे गटाने एकही पुरावा सादर केला नाही. निवडणूक आयोगाचा मान राखला जात नसल्याचा आरोपही शिंदे गटाने केला आहे.एकीकडे अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शुक्रवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होत आहे. त्यामुळे चिन्ह काेणाकडे जाते याबद्दल दाेन्ही पक्षांबराेबरच राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे