दुबईतील संयुक्त अरब अमिरातमधील जेबेल अली येथे बांधलेले नवीन हिंदू मंदिर सध्या चर्चेत आहे . हे मंदिर सिंधी गुरु दरबार मंदिराचा विस्तार असल्याचं म्हटल्या जातं. यूएईमधील सर्वात जुन्या हिंदू मंदिरांपैकी एक ते आहे. २०२० मध्ये येथे १६ देवी-देवतांच्या मूर्तींसह मंदिराची पायाभरणी झाली होती . मंत्री शेख नाह्यान बिन मुबारक अल नाहयान यांनी मंदिराचे उद्घाटन केले. दुबईच्या जेबेल अली भागात हिंदू मंदिर उभारण्याचे भारतीयांचे दशकभराचे स्वप्न यामुळे साकार झाले आहे.
आज दसऱ्याच्या मुहूर्तावर मंदिर अधिकृतपणे उघडण्यात आले आहे. या हिंदू मंदिराचे उद्घाटन युएई चे सहिष्णुता मंत्री, महामहिम शेख नह्यान बिन मुबारक अल नाह्यान यांच्या हस्ते करण्यात आले. या मंदिराचे औपचारिक उद्घाटन १ सप्टेंबर रोजीच झाले होते.सहिष्णुता, शांतता आणि सौहार्दाचा मजबूत संदेश म्हणून मंदिराकडे पाहिले जात आहे.
जेबेल अली हे गाव विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांसाठी प्रसिद्ध आहे आणि येथे सात चर्च, एक गुरुद्वारा आणि एक हिंदू मंदिर आहे. पांढऱ्या संगमरवरी बनवलेल्या मंदिराच्या आतील भागाचे दर्शन घेण्याची परवानगी होती. यावेळी हजारो भाविकांनी भगवंताचे दर्शन घेतले.
हे ही वाचा:
चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित
बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू
‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’
मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल
यात अलंकृत खांब, दर्शनी भागावर अरबी आणि हिंदू भौमितीय रचना आणि छतावर घंटा आहेत. दुबईच्या या भव्य हिंदू मंदिरात १६ देवी-देवतांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. मुख्य प्रार्थना हॉलमध्ये बहुतेक देवतांची स्थापना केली जाते. यात मध्यवर्ती घुमटावर एक मोठे थ्रीडी मुद्रित गुलाबी कमळ बसवलेले आहे. मंदिरात गुरु ग्रंथसाहिबची स्थापनाही केली आहे भारतीय आणि अरब वास्तू कलेचा एक सुंदर नमुना म्हणून या मंदिराकडे बघितल्या जात आहे