28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणविचारांचे सोने लुटायला आलेल्या शिवसैनिकांना मिळाले टोमण्यांचे खोके

विचारांचे सोने लुटायला आलेल्या शिवसैनिकांना मिळाले टोमण्यांचे खोके

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केलं.

Google News Follow

Related

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केलं. विचारांचं सोन लुटायला जमलेल्या शिवसैनिकांना पुन्हा गद्दार, खोके, पाठीतला वार, हुकुमशाही, डुक्कर, गुलामगिरी हे शब्द ऐकायला मिळाले. भाषणाची सुरुवात त्यांनी त्यांच्या नेहमीच्या टोमणे पद्धतीनेच केली. त्यामुळे उपस्थित शिवसैनिकांना नेहमीचेच टोमणे ऐकायला मिळाले.

उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या भावनिक साद घालण्याच्या शैलीत भाषण सुरू केले. तुमचं हे प्रेम विकत मिळत नाही, ओरबाडून घेता येत नाही, ही काही कोरडी गर्दी नाही. ही माझ्या जिवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी आहे. म्हणूनच डॉक्टरांनी वाकायला सांगितलं नसताना मी तुमच्यासमोर नतमस्तक झालो. त्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. यापूर्वी याच शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना नतमस्तक झालो होतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुन्हा एकदा गद्दार, खोके या शब्दांचा राग आळवताना उद्धव म्हणाले की, ज्या वेळी आपल्या शिवसेनेमध्ये गद्दारांनी गद्दारी केली. होय ते गद्दारच आहेत त्यामुळे गद्दारच म्हणणार. तुमच्याकडे असलेली मंत्रिपद ही काही काळापुरती आहेत, पण जो गद्दारीचा शिक्का बसला आहे तो पुसायचा म्हटला तरी पुसता येणार नाही. शिवसेनेचं काय होणार हा प्रश्न सर्वांना पडला होता पण माझ्या मनात चिंता नव्हती. गद्दारांच कसं होणार? इथे आणलेला एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे. तिकडे एकच आहे पण इकडे सगळे एकनिष्ठ आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील या भाषणात शब्दांचे खेळ पाहायला मिळाले. परंपरेप्रमाणे रावण दहन होणार आहे. पण यावेळेचा रावण वेगळा आहे. आतापर्यंत दहा तोंडाचा रावण होता. पण आता ५० खोक्यांचा रावण झाला आहे, असा नेहमीचा टोमणा त्यांनी लगावला. ५० खोक्यांचा हा खोकासुर आहे, धोकासुर आहे, असे ते म्हणाले.

आपल्या प्रकृतीबद्दल सहानुभूती व्यक्त व्हावी या उद्देशाने उद्धव ठाकरे म्हणाले, शस्त्रक्रिया सुरू असताना ज्यांच्यावर जबाबदारी सोपावली होती तेव्हा या कटप्पा यांनी कट रचला की उद्धव ठाकरे पुन्हा उभे राहू शकणार नाहीत. पुढे ते म्हणाले की, त्यांना कल्पना नाहीये की हा उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे.

ज्यांना आपण मंत्रिपद, खासादारकी, आमदारकी असं सगळं दिलं ते गेले पण ज्यांना दिल नाही ते मात्र निष्ठेने उभे आहेत. जोपर्यंत शिवसैनिक सोबत आहेत तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. एका जरी निष्ठावंत शिवसैनिकाने सांगितले की गेट आउट तर मी असाच पायऱ्या उतरून घरी निघून जाईन, असं उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दारांनी सांगता कामा नये, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांना काय कमी दिलं आहे. बाप मंत्री, कार्ट खासदार, पुन्हा डोळे लावून बसलेत नातू नगरसेवक, असं बोलून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना टोमणा मारला आहे.

भाजपाने पाठीत वार केला म्हणून ही महाविकास आघाडी बनली. त्यांना धडा शिकवायला ती युती केली होती. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मी त्याचा मान ठेवला होतं तेव्हा माहित नव्हत का की बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बसले आहेत. बोलताना स्वतःची दाढी स्वतःच्या तोंडात जात होती, अशी वैयक्तिक टीका उद्धव ठाकरेंनी केली.

हे ही वाचा 

नवरात्र २०२२: सतीचे दात इथे पडले म्हणून दंतेश्वरी शक्तीपीठ

सी- लिंकवर झालेल्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू

दुसऱ्या महायुद्धाच्या ८३ वर्षांनंतर पोलंडची जर्मनीकडे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी

२४ वर्षांनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या तरुणीला फटकारले

मुस्लिमांनाही सांभाळून घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी या सभेतून केला. पक्षप्रमुखांनी सांगितलं आहे की या देशावर ज्याचं प्रेम आहे मग तो मुस्लीम असला तरी तो आमचा आहे. आपापला धर्म घरात ठेवावा बाहेर आल्यावर देश आपला धर्म पाहिजे, असं बाळासाहेब म्हणाले होते. तुमचं हिंदुत्व आहे तरी काय? इतर धर्मीय देशद्रोही हे हिंदुत्व आहे का? असा सवाल त्यांनी केला.

लोकशाही तरी जिवंत राहते की नाही हा प्रश्न आहे. जे पी नड्डा बोलून गेले की शिवसेना संपत चालली आहे. इतर पक्ष नकोत, म्हणून मी इशारा देत आहे की देश हुकुमशाहीकडे चालला आहे. गुलामगिरी येऊ शकते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. नड्डा यांनी आपला पक्ष वाढविण्याची घोषणा केल्याचा उल्लेख करत देशात कशी हुकुमशाही येणार आहे, अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मोहन भागवत हे मशिदीत जाऊन आले. त्यानंतर मुस्लीम म्हणतात ते राष्ट्रपिता आहेत. ते मुस्लिमांशी बोलल्यावर त्यांचा संवाद सुरू आहे आणि आम्ही काँग्रेस सोबत गेलो तर हिंदुत्व कसं सोडलं? अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. बिल्कीश बानो आणि अंकिता हत्या प्रकरणात काय कारवाई करण्यात येणार आहे? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसैनिक विचार ऐकायला आले आहेत. शिव्या देणं सोपं असतं पण विचार देणं कठीण असतं. पण दसरा मेळावा ही पवित्र परंपरा मी पुढे नेत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा