21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरधर्म संस्कृतीमातृशक्तीचा उद्घोष, महिलांना समानतेची वागणूक मिळायला हवी

मातृशक्तीचा उद्घोष, महिलांना समानतेची वागणूक मिळायला हवी

सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आवाहन

Google News Follow

Related

दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मेळाव्याला संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मातृशक्तीचे महत्त्व सांगितलेच पण महिलांना समानतेची वागणूक मिळायला हवी आणि त्यांना आपले निर्णय घेण्याची क्षमता देण्यात यायला हवी. महिलांशिवाय कोणताही समाज विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांचे सबलीकरण महत्त्वाचे आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

गिर्यारोहक संतोष यादव या मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणून संतोष यादव यांना सन्मान प्राप्त झाला आहे.

मोहन भागवत याचा धागा पकडून म्हणाले की, संघाच्या कार्यक्रमांमध्ये महिलांना प्राधान्यक्रम देणे, त्यांना अध्यक्षपदाचा मान देणे ही परंपरा राहिलेली आहे. प्रबुद्ध आणि कर्तृत्ववान महिलांना नेहमीच संघाच्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलेले आहे.

सरसंघचालक भागवत म्हणाले की,  समाजातील कर्तृत्ववान, आदर्श निर्माण करणाऱ्या माता भगिनींना आमंत्रित करणे, त्यांना सन्मानित करणे हे डॉक्टर साहेबांच्या वेळेपासूनच होत आहे. राजकुमारी अमृत कौर इथे आलेल्या आहेत. कुमुदताई रांगणेकरही संघाच्या मंचावर आलेल्या आहेत. पुरुष श्रेष्ठ की महिला श्रेष्ठ असा वाद आम्ही घालत नाही. दोघांशिवाय सृष्टी होऊ नाही. दोघे परस्पर पूरक आहेत. म्हणून समाजाच्या सगळ्या कामात पुरुष महिला एकत्र काम करतात. मातृशक्तीची उपेक्षा करता येणार नाही. त्यांनाही सशक्त केले पाहिजे. वत्सलता त्यांचा गुण आहे. जगतजननीच्या रूपात आम्ही त्यांची कल्पना करतो. कालांतराने त्यांच्यावर मर्यादा घालण्यात आल्या. विदेशी आक्रमण झाली तेव्हा त्यांच्या सुरक्षेच्या नावावर बंधनांना अधिकृत दर्जा मिळाला त्या बंधनांतून त्यांना कधी मुक्त केले नाही. जगतजननी मानले पण त्यासाठी त्यांना घरात बंद करू ठेवले तर ते योग्य नाही. मातृशक्तीला सशक्त, प्रबुद्ध करणे, त्यांना सर्वसमान अधिकार देणे. निर्णयात बरोबरीचे अधिकार देण्याची गरज आहे. २०१७मध्ये विविध संघटनांत काम करणाऱ्या सर्व महिलांनी सर्वे केला. सन्यासिनीपासून उद्योग चालविणाऱ्या महिलांची दखल त्यात घेण्यात आली. असे समग्र सर्वेक्षण प्रथमच झाले. सरकारकडेही तो अहवाल देण्यात आला. त्याचे निष्कर्षही तेच आहेत. पुरुष जे करू शकतात त्यापेक्षाही अधिक कामे महिला करू शकतात, त्यामुळे त्यांना प्रबुद्ध बनवणे आवश्यक आहे.

नाविन्याचा पुरस्कार कराच,पण सनातनला विसरून चालणार नाही

सरसंघचालक भागवत यांनी सनातन धर्माचे महत्त्व यावेळी सांगितले. ते म्हणाले की, सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला चालायचे आहे. त्यात आव्हाने येतात. दोन गोष्टींपासूमन सावध राहायला हवे. रुढीप्रियतेमुळे या वाटचालीत बाधा येते. काळ बदलतो त्यानुसार अनेक गोष्टी बदलते. आपले ज्ञान वाढते. त्यानुसार चालावे लागते. सनातन शाश्वत मूल्ये आहेत त्यावरच वाटचाल करावी लागेल. नित्यनूतन राहायचे आहे पण सनातन धर्माचे पालनही करायचे आहे. एकीकडे नाविन्याची कास धरली पाहिजेच पण सनातनचा पायाही भक्कम असला पाहिजे.

स्वार्थ साधण्यासाठी द्वेष उत्पन्न करण्याचा काही लोक प्रयत्न करतात. आमच्यात भेद निर्माण करतात. त्यामुळे आतंकाचे वातावरण तयार होते. देशात अराजकतेचे वातावरण तयार होते. कायद्यांचे वातावरण राहात नाही, भीती राहू नये, अशा कारवाया चालत राहिल्या आहेत. आपल्याशी जवळीक साधण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांच्या जाळ्यात सापडायचे नाही. राष्ट्रविरोधी गोष्टींचा निषेध करावा लागेल. प्रतिकार करावा लागेल. शासनाला आपण साथ दिली पाहिजे, असे सरसंघचालकांनी सुचविले.

हे ही वाचा:

रावणाच्या आईने आयुष्य व्यतित केले श्रीराम नामात

कोंबडी आणि दारूवाटप करून राष्ट्रीय ‘पार्टी’ची घोषणा

एकनाथ शिंदे यांच्या तिसऱ्या टिझरमध्ये ‘दहातोंडी रावण’

दुसऱ्या महायुद्धाच्या ८३ वर्षांनंतर पोलंडची जर्मनीकडे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी

 

जनसंख्येचे असंतुलन झाले तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. पूर्व तिमोर नावाच एक देश बनला. दक्षिण सुदान बनला. कोसोवो बनला. जनसंख्येत पंथ संप्रदाय आले तर देश तुटतात. जन्मदर हा भाग आहे. पण हाव, जोरजबरदस्तीने हे होते. संतुलन देशहितासाठी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. जनसंख्येची नीती बनली पाहिजे. भारतवर्षात इतक्या भाषा आहेत. पंथ संप्रदाय आहेत काही विदेशातील आक्रमणांमुळे झाले. पण त्यांच्या प्रार्थना इथल्याच आहेच. खानपान, रितीरिवाज इथलेच आहेत. तरीही सनातनचा प्रवाह सुरू आहे, असे सांगत पुन्हा एकदा भारतातील सगळ्यांना डीएनए सारखाच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा