उत्तर कोरियाने मंगळवार, ४ ऑक्टोबर रोजी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. उत्तर कोरियाने जपानवरुन क्षेपणास्त्र डागले आहे. त्यामुळे जपानमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सुचना केल्या आहेत.
मंगळवारी जपानच्या क्षेत्रात असलेल्या प्रशांत महासागरात सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी क्षेपणास्त्र पडले आहे. यानंतर जपान सरकारने जपानच्या उत्तरेकडील होक्कइडो बेट आणि ईशान्येकडील आओमोरी प्रांतातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आदेश दिले आहेत.
दक्षिण कोरियाच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने उत्तरेकडील जगांग प्रांतातील मुप्योंग-री येथून पूर्वेकडे हे क्षेपणास्त्र डागले.
हे ही वाचा:
जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या
मुंबई विमानतळावरून ९.८ कोटींचे कोकेन जप्त
काँग्रेसच्या पाच नेत्यांना ईडीकडून समन्स
मुस्लिम तरुण नाव बदलून गरब्यात घुसले, तिघांना अटक
अमेरिका आणि दक्षिण कोरियाने संयुक्त लष्करी सराव केला होता. उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग-उन यांनी याआधीच दोन्ही देशांना सराव न करण्याचा इशारा दिला होता. हा लष्करी सराव अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात झाला. त्यांच्या लष्करी सरावानंतर उत्तर कोरियानं एका आठवड्यात इतक्या क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. दरम्यान, जेव्हा-जेव्हा उत्तर कोरिया क्षेपणास्त्र चाचणी घेतं, तेव्हा जपान आणि दक्षिण कोरियासाठी चिंतेचा विषय बनलेला असतो. यातील बहुतांश क्षेपणास्त्रं जपानच्या समुद्राला लक्ष्य करत असतात.