27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाशाओमीला ५ हजार ५५१ कोटी रुपयांचा दंड

शाओमीला ५ हजार ५५१ कोटी रुपयांचा दंड

Google News Follow

Related

चिनी कंपनी शाओमीला भारत सरकारने जोरदार झटका दिला आहे. ईडीच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, चीनी टेक कंपनी शाओमी गेल्या सात वर्षांपासून गुप्तपणे भारतातून चीनला पैसे पाठवत होती. शाओमीवर चुकीच्या पद्धतीने परदेशात पैसे पाठवल्याचा आरोप आहे. शाओमी कंपनी २०१४ मध्ये भारतात सुरू झाली.

शाओमीने सुरु झाल्यानंतर एका वर्षानंतर २०१५ मध्ये भारतातून चीनला पैसे पाठवायला सुरुवात केली. शाओमीवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ईडीने शाओमीवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ५ हजार ५५१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. कंपनीविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्टच्या नियमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. ईडीने फेमाअंतर्गत शाओमीच्या बँक खात्यांमध्ये जमा केलेले सुमारे ५ हजार ५५१ कोटी रुपये संलग्न केले आहेत.

ईडीने सांगितले की, शाओमीची बँक खाती फेमा कायद्याच्या कलम 37A अंतर्गत गोठवण्यात आली आहेत. प्राधिकरणाची मान्यता मिळालेल्या भारतातील कंपनीवर झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती आहे. यापूर्वी शाओमीच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला होता. या प्रकरणाच्या तपासात असे आढळून आले की शाओमीने भारतातून चुकीच्या पद्धतीने पैसे पाठवले होते, जे फेमा कायद्याचे उल्लंघन आहे.

हे ही वाचा:

ज्येष्ठ अभिनेते अनु कपूर यांची फसवणूक

आणि पंतप्रधान मोदींनी चालवली गाडी

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगेंचे पारडे जड

“5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडणार”

ईडीने चीनी कंपनी शाओमीच्या कार्यालयांवर आणि कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले. ईडीने शाओमीच्या कार्यालयातील अनेक महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. ज्यामुळे भारताबाहेर चीनमध्ये पैसे हस्तांतरित केल्याचा आरोप आहे, ज्याच्या विरोधात चौकशी सुरू होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा