27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारण"5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडणार"

“5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडणार”

महाराष्ट्रात दोन प्रमुख शहरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात 5G सेवा सुरु केली जाणार आहे.

Google News Follow

Related

आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, १ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाईल काँग्रेसच्या सहाव्या सत्राचे उद्घाटन पार पडले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील 5G सेवेचा शुभारंभ केला.

5G इंटरनेटमुळे भारताला खूप मोठा फायदा होणार आहे. भारतामध्ये रिलायन्स जिओ आणि भारतीय एअरटेल टेलिकॉम कंपन्यांनी दिवाळीमध्ये 5G सेवा लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. आजच्या झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना एअरटेल आणि जीओ कंपन्यांने 5G चे प्रात्याक्षिक दाखवले आहे.

यावेळी मोदींनी ‘जिओ-ग्लास’सह इतर 5G उपकरणांची पाहणी केली आहे. तसेच मोदींनी एंड टू एंडचे स्वदेशी तंत्रज्ञानही समजून घेतले आहे. 5G सेवा सर्वप्रथम देशातील १३ शहरांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. नागरिकांना 5G सेवा ही 4G पेक्षा दहापट वेगाने असणार असल्याचे सांगितले आहे.

5G सेवेचा शुभारंभ झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5G चे फायदे आणि 5G सेवेचा देशामध्ये तंत्रज्ञानातील क्रांतीला कशी मदत होईल, याबद्दल माहिती दिली आहे. तसेच परवडणारे तंत्रज्ञान आणि व्यापक नेटवर्कची गरज यासह डिजिटल इंडिया चळवळीला 5G नेटवर्कचा मोठा फायदा होणार आहे. २०१४ मध्ये भारतात २५ कोटी इंटरनेट वापरकर्ते होते. आज हीच संख्या ८५ कोटी झाली आहे. ग्रामीण भागातूनही इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहे.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, 5G नेटवर्कचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. येणाऱ्या काळात 5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडण्याची शक्यताही मोदींनी वर्तवली आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.

हे ही वाचा:

कांदिवलीत झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू

याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल

मासेमारीसाठी गेलेले १६ मच्छिमार पाकिस्तानच्या ताब्यात

युक्रेनचे चार प्रांत विलीन करण्याच्या करारावर पुतीन यांची स्वाक्षरी

भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर 5G नेटवर्कचा शुभारंभ हे एक मोठं आणि महत्त्वाचे पाऊल आहे. भारतील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात दोन प्रमुख शहरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात 5G सेवा सुरु केली जाणार आहे. यामध्ये मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश आहे. यासोबतचं दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरु, चंदीगड, गांधीनगर, हैदराबाद, जामनगर, लखनौ या शहरांमध्येही 5G सेवा सुरु केली जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा