27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाआणखी एका डिलिव्हरी बॉयने तरुणीची छेड काढली

आणखी एका डिलिव्हरी बॉयने तरुणीची छेड काढली

तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने त्याचा गैरफायदा घेतला.

Google News Follow

Related

काही दिवसांपूर्वीच पुण्यात एका खाद्यपदार्थ वितरित करणाऱ्या इसमाने एका मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेत विनयभंग केला होता. ही घटना ताजी असतानाच आता पनवेलमधून संतापजनक प्रकार समोर आला आहे. पनवेलमध्ये एका महिलेला डिलिव्हरी बॉयने ‘आक्षेपार्ह स्पर्श’ केल्याची घटना घडली आहे.

पनवेलमधील कोन गावाजवळ इंडियाबुल्स नावाची इमारत आहे. या इमारतीत पीडित महिलेने खाद्य मागवले होते. एकजण खाद्यपदार्थ पोहचविण्यासाठी पीडितेच्या इमारतीमध्ये आला होता. तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने त्याचा गैरफायदा घेतला. तरुणीला आक्षेपार्ह स्पर्श करून आरोपीने तेथून पळ काढला.

तरुणीने तात्काळ पोलीस स्थानक गाठले आणि तक्रार नोंदवली. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिलीव्हरी बॉयविरोधात वियनभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. सीसीटीव्ही फुटेज, फोन नंबर आणि तरुणीच्या जबाबातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून आता घेतला जात आहे. मोहम्मद रिजवान शेख असे डिलीव्हरी बॉयचे नाव आहे.

हे ही वाचा:

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याआधी उधमपूर बॉम्बस्फोटाने हादरले

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसणार नव्या रुपात

नवरात्र २०२२ : परशुराम माता, रेणुकादेवीची कथा

कोकण विभागाकडून ११४ शेतकऱ्यांना पर्यटन प्रमाणपत्र  

दरम्यान, पुण्यात घडलेल्या चुंबन घटनेत आरोपीला काही वेळातच अटकसुद्धा झाली होती. याआधीही पुण्यात अशीच एक घटना घडली होती. खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणारा एक तरुण ८ वर्षाच्या मुलीला त्रास देत असल्याचे समोर आले होते. सदर मुलगी आपल्या घरी जात असताना त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अशा घटनांमुळे महिलांना एकटे असताना खाद्यपदार्थ पार्सल मागावावेत की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा