27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामागृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याआधी उधमपूर बॉम्बस्फोटाने हादरले

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याआधी उधमपूर बॉम्बस्फोटाने हादरले

आठ तासात दुसरा स्फोट

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर सकाळी बॉम्बस्फोटाने हादरले. जुन्या बसस्थानकाजवळ उभ्या असलेल्या बसमध्ये सकाळी ६ वाजता भीषण स्फोट झाला. आठ तासात झालेला हा दुसरा स्फोट आहे. बुधवारी रात्री उशिरा १०.४५ वाजण्याच्या सुमारास डोमिले चौकाजवळ असाच स्फोट झाला होता. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

गृहमंत्री अमित शहा ४ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या स्फोटांनंतर उधमपूर शहरासह राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे. एवढेच नाही तर शहरातील गजबजलेल्या भागातही सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

एडीजीपी जम्मू मुकेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट उधमपूरमधील डोमेल चौक जवळील पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या बसमध्ये झाला, तर दुसरा स्फोट आज सकाळी जुन्या बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये झाला.या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. हे दोन्ही स्फोट एकच होते. रात्री झालेल्या बॉम्बस्फोटात कंडक्टरसह दोन जण जखमी झाले असले तरी आज सकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. उधमपूरच्या जुन्या बसस्थानकाजवळ हा स्फोट झाला. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

हे ही वाचा:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसणार नव्या रुपात

नवरात्र २०२२ : परशुराम माता, रेणुकादेवीची कथा

कोकण विभागाकडून ११४ शेतकऱ्यांना पर्यटन प्रमाणपत्र  

डीए वाढला; सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट

जखमींची चौकशी करण्यात आली असून या घटनेचा दहशतवादाशी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी एक ‘अलर्ट’ जारी केला आहे आणि लोकांना त्यांच्या वाहनांची काळजी घेण्यास सांगितले आहे जेणेकरुन त्यांच्यामध्ये काही संशयास्पद आढळल्यास, वेळेत त्याची तक्रार करता येईल.वाहनसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यापूर्वी कसून तपासणी केली जात आहे. सकाळी स्फोट होण्यापूर्वी बसस्थानकातून बाहेर पडणारी सर्व वाहनेही चेकपोस्टवर थांबवून त्यांची झडती घेतली जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा