27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाशर्ट आणि चॉकलेट मधून केली जात होती सोन्याची तस्करी

शर्ट आणि चॉकलेट मधून केली जात होती सोन्याची तस्करी

३७० ग्राम सोन्याचे रॅपर जप्त 

Google News Follow

Related

तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या गुन्हेगार करत असतात. यावेळी सोन्याची तस्करी करण्यासाठी अशाच वेगळ्या पद्धतीचा वापर करण्यात आला पण कस्टम विभागाने त्यांना अचूक हेरले.

चॉकलेट आणि शर्ट मधून सोन्याची तस्करी होत असल्याचा प्रकार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडकीस आला आहे, दुबई येथून आलेल्या एका प्रवाशांकडून जप्त करण्यात आलेले चॉकलेट आणि शर्टमधून लपवून आणलेले सुमारे ३७० ग्राम सोन्याचे रॅपर जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मुंबई कस्टम विभागाने  मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ  येथे करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले असून त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे.

दुबई येथून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाचे सामान कस्टम विभागाकडून तपासत असताना या प्रवाशाच्या बॅगेत असलेल्या चॉकलेट आणि पॅकिंग शर्टवर संशय येताच कस्टम विभागाने चॉकलेट आणि शर्ट ताब्यात घेण्यात आले. हे चॉकलेट उघडून बघितले असता चॉकलेट रॅप करण्यासाठी आतून वापरण्यात आलेला पेपर हा काहीसा वेगळा  असल्याचे लक्षात आले.

हे ही वाचा:

कोकण विभागाकडून ११४ शेतकऱ्यांना पर्यटन प्रमाणपत्र  

डीए वाढला; सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट

PFI बंदीवर काँग्रेसची प्रतिक्रिया; संघावर बंदी हवी!

एकनाथ शिंदे, फडणवीसांनी केला PFI वर घणाघात

 

कस्टम विभागाने हे रॅपर तपासले असता हे रॅपर अस्सल सोन्याचे असल्याचे समोर आले, तसेच शर्टाच्या आत मध्ये असलेल्या पॅकींगमध्ये सोने आढळून आले. कस्टम विभागाने सर्व चॉकलेटचे रॅपर काढून वजन केले असता ३६९.ग्राम ६७० मिलिग्रॅम एवढे सोन्याचं रॅपर मिळून आले आहे. याप्रकरणी  कस्टम विभागाने या प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा