22 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरदेश दुनियाइराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाने घेतले ७५ जणांचे बळी

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाने घेतले ७५ जणांचे बळी

महसा अमिनीच्या मृत्युनंतर आंदोलन ४६ शहरात पसरले

Google News Follow

Related

इराणमध्ये हिजाबविरोधातील आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले असून जवळपास ७५ लोकांचा यात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीचा पोलिस ठाण्यात मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये हे आंदोलन सुरू झाले. गेले १० दिवस हे आंदोलन आता सुरू आहे.

तेहरान या इराणच्या राजधानीत तर हुकुमशहाला मृत्युदंड द्या अशा घोषणा केल्या जाऊ लागल्या आहेत. तीन दशके ज्या आयातोल्ला खोमेनी यांचे सरकार आहे, त्याचा निःपात करा अशी आंदोलकांची मागणी आहे.

महसाच्या निधनानंतर इराणच्या ४६ शहरांत या आंदोलनाचे लोण पसरले. इराणच्या टीव्हीने ४१ आंदोलक मृत्युमुखी पडल्याचे म्हटले आहे तर असोसिएटेड प्रेसने १३ जण मृत्युमुखी पडल्याचे म्हटले आहे. १२०० आंदोलकांना अटक करण्यात आल्याच्याही बातम्या आहेत.

सरकारने तर इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, लिंकेडिन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. त्यामुळे आंदोलकांना बाहेरच्या जगाशी आपल्या आंदोलनाशी जोडता येणे शक्य होत नाही.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली, शिंदेंना दिलासा

ब्रिटनमधील हिंदू मंदिरांवरील हल्ले थांबवा, जिहाद्यांना अटक करा

शिवभोजन थाळी बंदचा निर्णय नाही

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराजने दाखवून दिले खरे हिंदुत्व

 

इराणच्या निमलष्करी दलाचे गार्ड हे मोटरसायकलवरून आंदोलकांना मारहाण करत आहेत. पण आंदोलकही या पोलिसांशी संघर्ष करत आहेत. संतप्त आंदोलकांनी गाड्या पेटविल्याचे व्हीडिओदेखील समोर येत आहेत.

मानवअधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत. त्यांना इशारे देऊन अटकही करण्यात येत आहे. आंदोलनांमध्ये सहभागी झाल्यास त्यांना अटक करण्यात येईल, असा इशाराही सरकारकडून देण्यात आला आहे.

महसा अमिनी या तरुणीने हिजाब घातला नव्हता त्यामुळे तिला पोलिस ठाण्यात नेऊन मारहाण करण्यात आली होती. त्यात ती मृत्युमुखी पडली. त्यानंतर या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले. अनेक महिलांनी हिजाब आगीत फेकल्याचे, आपले केस कापल्याचे व्हीडिओ व्हायरल केले. भारतातून मात्र या सगळ्या घटनेबद्दल मानवाधिकार कार्यकर्ते गप्प आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा