25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामाअंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांची बस उलटतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद

अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांची बस उलटतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद

ग्रीन सिटी संकुलातील अपघात सीसीटीव्हीत झाला कैद

Google News Follow

Related

अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलबस उलटल्याची घटना घडलीये. अंबरनाथ पूर्वेच्या ग्रीन सिटी संकुलात घडलेला हा अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय. या व्हीडिओची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.

अंबरनाथच्या रोटरी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक खासगी मिनी स्कुल बस आज सकाळी पावणेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेण्यासाठी ग्रीन सिटी संकुलात आली. रिव्हरवूड इमारतीसमोरील उतारावर या बसचालकाने बस रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला असता बसवरील चालकाचं नियंत्रण सुटून बस उलटली. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी बसवर चढून तातडीनं सगळ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. या घटनेत दोन विद्यार्थ्यांना किरकोळ स्वरूपाची इजा झाली असून इतर विद्यार्थ्यांना सुदैवानं कोणतीही इजा झालेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांना खुशखबर!! लवकरच जागा भरणार

नारायण राणे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा ‘उजवा हात’ एकनाथ शिंदे गटात

पीएफआयवर ठाकरेंचा मौन राग….

 

दरम्यान, रोटरी शाळा व्यवस्थापनानं ही बस आमच्या शाळेची नसून शाळेचा बससोबत कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. ही बस खासगी असून पालक त्यांच्या सोयीनुसार या बसने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत असल्याचं शाळा व्यवस्थापनानं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे स्थानिक रहिवाशांनी बस मालकाविरोधात संताप व्यक्त केलाय. या बसचा इन्शुरन्स नव्हता, तसंच बसची अवस्थाही अतिशय मोडकळीस आलेली होती, त्यामुळे यात बस मालकाचा निष्काळजीपणा असल्याचं सांगत पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

सीसीटीव्हीमध्ये ही बस उलटत असताना दिसत आहे. ती उलटी झाल्यानंतर स्थानिकांनी बसच्या दिशेने धाव घेतली. एक तरुण लगेच बसवर चढला आणि त्याने बसच्या आतील मुलांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नशिबाने आतील कुणालाही गंभीर स्वरूपाची इजा झाली नव्हती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा