28 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरसंपादकीयपीएफआयवर ठाकरेंचा मौन राग....

पीएफआयवर ठाकरेंचा मौन राग….

उद्धव ठाकरे कधी या विषयावर बोलणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Google News Follow

Related

सुरक्षा यंत्रणांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेवर २२ सप्टेंबर रोजी देशव्यापी कारवाई केली. १५ राज्यातील १०६ पीएफआय पदाधिकाऱ्यांची या कारवाईत धरपकड करण्यात आली. या कारवाईत गुप्तचर यंत्रणा, निम लष्करी दल, पोलिस आणि एनआयएचा सहभाग होता. पुण्यात झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी एकत्र आलेल्या मुस्लीम तरुणांनी नारा ए तकबीर, अल्ला हो अकबर, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. भाजपा, शिवसेना शिंदे गट, मनसे या पक्षांनी पीएफआयच्या घोषणाबाजीचा जोरदार निषेध केला, परंतु उद्धव ठाकरे गट मात्र याबाबत पूर्णपणे मौन आहे. ठाकरेंचे या प्रकरणातील मौन प्रचंड बोलके आहे.

पीएफआय़वर झालेल्या कारवाईनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा एकाही शिवसेना नेत्याचे बोटभर विधानही कुठे दिसले नाही. सामनाच्या अग्रलेखात सुद्धा कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाही. पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर राज्याचे गृहमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा घोषणा महाराष्ट्राच्या भूमीत खपवून घेतल्या जाणार नाही, घोषणाबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी नि:संदिग्ध ग्वाही देण्यात आली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्वीट करून ही किड एकदाची संपवून टाका, अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली. परंतु उद्धव ठाकरे यांना मात्र ही घटना अदखलपात्र वाटली असावी. पक्षात शिल्लक असलेला आक्रमकपणा भाजपा आणि शिंदे गटाच्या विरोधात वापरण्यासाठी जपून ठेवूया, उगाच पीएफआयच्याविरोधात खर्च व्हायला नको, असा विचार करून ते याबाबत व्यक्तच झाले नाहीत. नेस्को येथील मेळाव्यात बोलताना आमचे हिंदुत्व त्यांना कळते, म्हणून मुस्लिमही आमच्यासोबत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हे हिंदुत्व नेमके कसे आहे?

हे हिंदुत्व संभाजीनगरच्या नामांतराची गरज काय? असा सवाल करते. हिंदुत्वाच्या विरोधात वारंवार गरळ ओकणाऱ्या सुषमा अंधारे यांना पक्षाच्या नेतेपदी बसवते. हे हिंदुत्व स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करते. हे हिंदुत्व खरंच काही मुस्लीमांच्या लक्षात आले आहे. पीएफआयवर झालेल्या कारवाईनंतर मुस्लीम मूलनिवासी मंच संस्थेचे संस्थापक अंजूम इनामदार यांनी या कारवाईचा निषेध केला. ते पीएफआयचे मोठे समर्थक आहेत. हेच ईनामदार २७ ऑगस्टच्या एका ट्वीटमध्ये शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीचे स्वागत करतात. शिवसेनेचे हिंदुत्व कसे आहे, हे मुस्लीमांच्या खरोखर लक्षात आले आहे. ते अधिक प्रखरपणे लक्षात यावे म्हणून ठाकरे पीएफआयविरुद्धच्या कारवाईबाबत मौन आहेत.

नवे मित्र किंवा मतदार जोडताना विचार बाजूला ठेवायचा नसतो. अलिकडेच रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष उमर अहमद इल्यासी यांच्यासह पाच विचारवंतांची दिल्लीत भेट घेतली.मुस्लिम समाजातील काही विचारवंताशी संवाद साधला. योगायोगाने त्याच दिवशी पीएफआयवर देशभरात आजवरची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. संघ प्रेरणेतून गेली काही वर्षे मुस्लीम समाजाशी संवांद संपर्क वाढवण्याचे काम राष्ट्रीय मुस्लीम मंचच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. परंतु पीएफआयविरुद्ध झालेल्या कारवाईचा राष्ट्रीय मुस्लीम मंचाने जोरदार समर्थन केले. पीएफआयचा खात्मा आवश्यकच असल्याचे स्पष्ट मत संस्थेचे संयोजक मोहम्मद फाजल आणि शाहीद अख्तर यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा:

जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन

PFI च्या निशाण्यावर होते संघाचे मुख्यालय

रशियामध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू

हा आहे गुलाम नबी आझाद यांचा नवा पक्ष

 

मुस्लिमांसोबत काम करणारी एखादी राष्ट्रवादी संस्था पीएफआयला संपवण्याची भाषा करते, परंतु आक्रमक हिंदुत्वासाठी ओळखली जाणारी शिवसेना मात्र मूग गिळून बसते याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याची वारंवार टीका होत असते, त्यामुळे पीएफआयवर झालेल्या कारवाईनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होईल, अशी खणखणीत प्रतिक्रिया देणे उद्धव ठाकरे यांना शक्य होते. पण ती दिली राज ठाकरे यांनी.

उद्धव ठाकरे यांनी ओवेसी मार्ग स्वीकारला. पीएफआयबाबत प्रश्न विचारल्यानंतर असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते की मला पीएफआयबाबत माहिती नाही. तुम्हाला प्रश्न विचारयचे असतील तर ते त्यांच्या लोकांना विचारा. उद्धव ठाकरे यांनी न बोलता तीच लाईन घेतली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा