27 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामाएनआयएच्या कारवाईनंतर पीएफआयकडून केरळमध्ये तोडफोड

एनआयएच्या कारवाईनंतर पीएफआयकडून केरळमध्ये तोडफोड

राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या (एनआयए) नेतृत्वाखालील विविध एजन्सींनी २२ सप्टेंबर रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया पीएफआय या वादग्रस्त संघटनेच्या कार्यालयांवर, नेत्यांच्या घरांवर आणि इतर ठिकाणी छापे टाकले.

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या (एनआयए) नेतृत्वाखालील विविध एजन्सींनी २२ सप्टेंबर रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया पीएफआय या वादग्रस्त संघटनेच्या कार्यालयांवर, नेत्यांच्या घरांवर आणि इतर ठिकाणी छापे टाकले. याच्या निषेधार्थ पीएफआयने २३ सप्टेंबर रोजी केरळ बंदची हाक दिली आहे. या बंदच्या दरम्यान राज्यातील अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

या बंद दरम्यान केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये कार आणि ऑटो रिक्षासारख्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांच्या वाहनावरही हल्ला झाल्याची माहिती आहे. यासोबतच पीएफआयने सदस्यांच्या अटकेनंतर तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे हिंसक निदर्शने केली आहेत. यासोबतच भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर भाजपा कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनी लाँड्रिंग आणि पीएफआयच्या टेरर फंडिंग प्रकरणी एनआयए आणि ईडीने हा छापा टाकला होता.

याआधी गुरुवारी सकाळी एनआयए आणि इतर गुप्तचर यंत्रणांनी देशभरात उपस्थित असलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणी छापे टाकल्याची बातमी येताच पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी छापे टाकले होते त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि घोषणाबाजी केली.

हे ही वाचा:

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’

पाच राज्यांमध्ये ९३ ठिकाणी छापे

२२ सप्टेंबर रोजी एनआयए आणि इतर यंत्रणांनी १५ राज्यांमध्ये ९३ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. यावेळी १०६ पीएफआय नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. केरळमध्ये सर्वाधिक २२ पीएफआय कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व घटनांनंतर भाजपाच्या केरळ युनिटने पीएफआयवर कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. पीएफआयच्या प्रस्तावित बंदच्या पार्श्वभूमीवर केरळ पोलिसांनी राज्यात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा