24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची शाखा आता जम्मूतही

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची शाखा आता जम्मूतही

Google News Follow

Related

स्वा. सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने जम्मू येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाला २६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांची जम्मूमध्ये शाखा सुरू केली जाणार आहे.

‘सिंधु नदी से सिंधु सागरतक स्वातंत्र्यवीरोंकी बात’ (सिंधु नदीपासून ते सिंधु सागरापर्यंत पसरणार स्वातंत्र्यवीरांची विचारधारा!) अशा घोषवाक्याच्या उद्देशातून जम्मूमधील ही शाखा सुरू केली जात आहे. स्वा. सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य अखंड भारताच्या निर्मितीसाठी वेचले. वयाच्या पंधराव्या वर्षी नाशिक नजीकच्या भगूर या आपल्या मूळ निवासस्थान असलेल्या गावामधून त्यांनी देशकार्याचा विडाच उचलला होता. या ध्येयासाठी त्यांनी अहर्निश प्रयत्न केले. २५ वर्षांची एक अशा दोन जन्मठेपेच्या शिक्षाही त्यांना झाल्या. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना टाकण्यात आले होते. अंदमानच्या या तुरुंगवासाच्या काळ्यापाण्याची शिक्षा असंही म्हटलं जात असे. अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण त्यापूर्वी भारताची फाळणी झाली होती. अर्थात त्या स्वातंत्र्याचेही स्वागत स्वा. सावरकर यांनी केले. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय म्हणजे सामाजिक एकता असेच ठेवले.

हे ही वाचा:

भारत तिबेट सहयोग मंचातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी देशाबाहेर आणि देशातही अनेक सभा घेतल्या. अशीच एक सभा त्यांनी जम्मूमध्येही १९४२ साली घेतली होती. त्यावेळच्या राजाने तेव्हा त्यांचे स्वागतही केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जम्मूमधील त्या भेटीला आता ७९ वर्षे होत असून या मोठ्या कालावधीत जम्मू- काश्मीरमध्ये मोठमोठे बदल झाले. काश्मिरी हिंदूंच्या क्रूर हत्याही झाल्या, दहशतवादी हल्लेही या जम्मू-काश्मीरने झेलले. या दरम्यानच्या काळात ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी राज्यात लागू असणारे कलम ३७० आणि ३५ ए संपुष्टात आणले गेले. या राज्यातील विद्यमान जनतेला व त्यांच्या नव्या पिढीला देशाच्या मुख्य प्रवाहात सामावता यावे, बळकट करावे आणि भारताच्या ऐतिहासिक संपत्तीला समृद्ध करता यावे, या उद्दिष्टातून जम्मू येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईची शाखा सुरू करण्यात येत आहे. जम्मूची ही शाखा सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सह कार्यवाह स्वप्निल सावरकर यांच्या उपस्थितीत स्थापन केली जाईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा