दसरा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पण शिवाजी पार्कवर अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी अद्याप परवानगी मिळालेली नसल्याने ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली. पूर्व परवानगी मागूनही मुंबई महानगर पालिकेनं त्याबाबत निर्णय घेतलेला नाही त्यामुळे शिवाजी पार्कवर वार्षिक दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. शिवसेना आणि सचिव अनिल देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे .याचिकेत म्हटले आहे की, मेळाव्यासाठी ऑगस्टमध्ये रॅलीसाठी परवानगी मागण्यासाठी सादर केलेल्या अर्जांवर अद्याप निर्णय न घेतल्याने उच्च न्यायालयात जाण्यास भाग पाडत असल्याचं शिवसेनेने म्हटले आहे या संदर्भात शिवसेनेनं कोर्टात याचिका दाखल केली आहे
शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला त्वरीत परवानगी देण्याचे निर्देश बृहन्मुंबई महापालिकेला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. बुधवारी न्या. आर डी धानुका यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेचा उल्लेख करण्यात आला असून त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
सेनेने ऍडव्होकेट जोएल कार्लोस यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, पक्ष १९६६ पासून शिवाजी पार्कवर दरवर्षी दसरा मेळावा घेत आहे आणि मुंबई महानगर पालिकेनं त्याला नेहमीच परवानगी दिली होती. न्यायमूर्ती रमेश धनुका यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ किंवा न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे. येत्या ५ ऑक्टोबरला दसरा मेळावा असल्यानं अर्जाची प्राथमिक माहिती देऊन सुनावणीसाठी तातडीची तारीख देण्याची विनंती शिवसेना करू शकते असे म्हटले जात आहे .
हे ही वाचा:
पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले
“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”
बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप
अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन
दसरा मेळाव्यावरून सध्या खूप वाद निर्माण झाला आहे. या मेळाव्यासाठी शिंदे गटाला बांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानाची परवानगी मिळाली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गट आग्रही आहेत. शिवाजी पार्कला सील लावल्यास ते तोडण्याचा इशारा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. तर पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी कोणताही पार्क किंवा मैदान हे कोणाच्याही मालकीचे नसते ती सार्वजनिक मालमत्ता आहे त्यामुळे पालिका ज्यांना परवानगी देईल त्यांची सभा शिवाजी पार्कवर होईल शिवतीर्थ यांचा आहे त्यांचा आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही असे म्हटले आहे.