29 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाकुठे आहे धाक ? गुन्हेगारांनी लॉकअपमधून दिल्या पोलिसांना धमक्या

कुठे आहे धाक ? गुन्हेगारांनी लॉकअपमधून दिल्या पोलिसांना धमक्या

आरोपीवर गुन्हा दाखल

Google News Follow

Related

खंडणी,धमकी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने चक्क लॉकअप मधून पोलीस अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मुंबईतील वांद्रे पोलीस लॉकअप येथे घडली. मुंबई पोलिसांची गुन्हेगारांवर कुठलाही धाक आणि भीती उरलेली नसल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.

वांद्रे पोलीस ठाण्याच्या परिसरात जनरल लॉकअप ( पोलीस कोठडी) आहे. या कोठडीत वांद्रे, बीकेसी, खार इत्यादी पोलीस ठाण्यातील आरोपीना पोलीस कोठडीत असतांना ठेवण्याची व्यवस्था आहे. सध्या या लॉकअप मध्ये वांद्रे पोलिसांनी अटक केलेला सराईत गुन्हेगार शंकर श्रीपाद माने (४५) आणि त्याचा मुलगा साहिल शंकर माने (२२) यांच्यासह विविध गुन्ह्यातील आणि पोलीस ठाण्यातील अशा एकूण ८ आरोपींना ठेवण्यात आलेले आहे.

हे ही वाचा:

उद्धव यांचा दसरा मेळावा म्हणजे पवार आणि सोनियांच्या मिश्र विचारांचा

सपा नेत्याने दिली होती सेंट्रल व्हिस्टा बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांनी केली अटक

इराणमध्ये एल्गार भारतात सगळे ‘थंडगार’

जपानमध्ये चक्रीवादळाचा कहर, लाखो लोक बेघर

 

वांद्रे पोलीसानी नुकतीच शंकर माने याला खंडणी, धमकी, आणि शस्त्र बाळगणे या गुन्हयात अटक केली असून त्याचा मुलगा साहिल याला जबरी चोरी, धमकीच्या गुन्हयात अटक केलेली आहे. न्यायालयाने या दोघांना पोलीस कोठडी सुनावली असल्यामुळे त्यांना वांद्रे लॉकअप मध्ये ठेवण्यात आले आहे. सोमवारी दुपारी कर्तव्यावर असणारे पोलीस उपनिरीक्षक हे लॉकअप तपासणीसाठी गेले असता लॉकअप मध्ये असलेला आरोपी शंकर माने याने आवाज देऊन बोलावून घेतले व ‘तुला जास्त मस्ती आली का,तुला मी कोण आहे माहित आहे का अशी धमकी देत माझ्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करताय का, थांब बाहेर येऊ दे. तुझे हातपाय तोडुन टाकतो, माझा इतिहास तुला माहीत नाही, एकदा तपासून बघ अशी धमकी देऊन अंगावर मारायला धावून येऊ लागला.

आरडा ओरड एकूण इतर पोलीस अधिकारी लॉकअप कडे धावून आले. त्यांनी शंकर माने या आरोपीला शांत राहण्यासाठी सांगत असताना देखील शंकर माने हा धमकी देत होता. अखेर वांद्रे पोलिसानी त्याच्या विरुद्ध दुसरा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कोठडीत असताना आरोपीने पोलिसाना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे हा प्रकार गंभीर असून या पोलिसांचा गुन्हेगारावर कुठलाही धाक उरलेला नसल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा