राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. सोमवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी शरद पवारांना धमकी आली होती. त्यांनी दौऱ्यावर जाऊ नये असे अज्ञात व्यक्तीकडून सांगण्यात आले होते. मात्र, तरीही त्यांनी त्यांचा पूर्वनियोजित दौरा पूर्ण केला.
एका अज्ञात व्यक्तीकडून शरद पवारांना आज सकाळी कुर्डुवाडीमध्ये दौऱ्यासाठी येऊ नये, अशी धमकी देण्यात आली होती. मात्र, तरीही ते कुर्डुवाडीच्या दौऱ्यावर गेले होते. दरम्यान, फोन करणारी ही व्यक्ती कोण आहे आणि त्याने ही धमकी का दिली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा:
‘उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मतांचा अपमान केला’
टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’
संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला
मुंबई पोलीस कंट्रोल रूमला हा फोन आल्याची माहिती आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा नंबर रेकॉर्डवर आला आहे. या नंबरचा शोध पोलीस घेत असून धमकीचा हा फोन सोलापूरवरून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हा पोलिसांकडून सुरू आहे.