पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी- २० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्वच देशांच्या संघाची घोषणा झालेली आहे. तसेच या स्पर्धेत खेळाडू कोणत्या जर्सीमध्ये दिसणार हे सुद्धा काही संघांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, भारतीय संघाची जर्सी कशी असणार याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाच्या जर्सीची पहिली झलक दाखवली आहे.
भारतीय संघाचा अधिकृत कीट पार्टनर MPL ने नवीन किटचे डिझाइन आणि पॅटर्न बदलला आहे. यावेळी जर्सीमध्ये दोन रंगांच्या छटा आहेत. गळ्याकडे आणि हाताचा भाग गडद निळ्या रंगात आहे तर बाकी भाग स्काय ब्लू रंगाचा आहे. डाव्या बाजूला गडद निळ्या रंगात छोटी डिझाईनदेखील आहे.
बीसीसीआयने आपल्या सोशल मीडियावरून नवीन जर्सी परिधान केलेल्या काही खेळाडूंचा फोटो शेअर केला आहे. यात भारतीय पुरुष संघाचे रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि महिला संघातील हरमनप्रीत कौर, रेणुका सिंग आणि शेफाली वर्मा यांचा समावेश आहे.
To every cricket fan out there, this one’s for you.
Presenting the all new T20 Jersey – One Blue Jersey by @mpl_sport. #HarFanKiJersey#TeamIndia #MPLSports #CricketFandom pic.twitter.com/3VVro2TgTT
— BCCI (@BCCI) September 18, 2022
तसेच बीसीसीआयने लिहिलं आहे की, “भारतातील सर्व क्रिकेट चाहत्यांनो, ही तुमच्यासाठी आहे. सादर करत आहोत नवीन T20 जर्सी- वन ब्लू जर्सी.” तसेच हर फॅन की जर्सी असा हॅशटॅग देखील वापरण्यात आला आहे.
हे ही वाचा:
हॉस्टेलमधील ‘त्या’ मुलींचे व्हिडीओ काढणाऱ्या मुलीला शिक्षिकेने विचारला जाब
राज ठाकरेंनी विदर्भात निवडणूक तयारीचे दिले आदेश
मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा जागतिक विक्रम
आयसीसी पुरुष टी- २० विश्वचषक २०२२ ही स्पर्धा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होणार असून पुढे दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि आणखी दोन संघांशीसुद्धा होणार आहे.